AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोड शो, रॅलीवरील बंदी वाढवली! पण तरिही दिलासादायक कोणता निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय?

निवडणुकीसाठीचे रोड शो, आणि सर्व प्रकारच्या रॅलीवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बंदीमध्ये वाढ करतानाही निवडणूक आयोगानं महत्त्वपूर्ण दिलासा राजकीय पक्षांना दिला आहे.

रोड शो, रॅलीवरील बंदी वाढवली! पण तरिही दिलासादायक कोणता निर्णय निवडणूक आयोगानं घेतलाय?
निवडणूक आयुक्त सुशील चंद्र
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 7:20 PM

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांचा (5 State Assembly Election) प्रचार ऑनलाईनच करण्याचं आवाहन करताना निवडणूक आयोगानं (Election Commission) महत्त्वाचे निर्देश दिले होते. रोडशो, प्रचारसभा, रॅली यावर बंदी घालण्यात आली होती. अखेर ही बंदी उठणार की नाही, याबाबत आज निर्णय करण्यात येणार होता. याकडे पाचही राज्यांच्या राजकीय उमेदवारांचं लक्ष लागलं होतं. अखेर निर्णय समोर आला असून कोणत्याही राजकीय पक्षांना या निर्णयातून अल्पसा दिलासा मिळाला आहे. कारण निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना प्रचार ऑफलाईन करता येणार नव्हता. अनेकांना ऑनलाईन (Online) प्रचारावरच भर द्यावा लागला होता. दरम्यान, जे नियम निवडणूक आयोगानं घालून दिले आहेत, त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासोबत काही नियमांत अल्पसा बदल करण्यात आला आहे. आज पाच निवडणूक राज्यांचे आरोग्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार आता 31 जानेवारीपर्यंत ऑफलाईन प्रचारावर बंदीच असणार आहेत. मात्र अशातही काही अंशी दिलासादेखील देण्यात आला आहे.

बंदी कायम, प्रचारसभा कधी होणार?

निवडणुकीसाठीचे रोड शो, आणि सर्व प्रकारच्या रॅलीवर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, बंदीमध्ये वाढ करतानाही निवडणूक आयोगानं महत्त्वपूर्ण दिलासा राजकीय पक्षांना दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानं 28 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत प्रचारसभा घेण्यासाठी सूट दिली आहे. त्याचप्रमाणे दारोदारी जाऊन प्रचार करण्यासाठीही लोकांच्या सहभागाची मर्यादाही वाढवण्यात आली आहे. डोअर टू डोअर प्रचारासाठी आता 5 ऐवजी 10 लोक भाग घेऊ शकतात. याआधी पाच जणांना दारोदारी जाऊन प्रचार करण्यास मुभा होती.

दरम्यान, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना 300 लोकांसह किंवा स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के हॉलमध्ये सभा घेण्याची परवानगी दिली होती. देशात कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी सर्व राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या रॅलींवर बंदी घातली होती आणि केवळ आभासी प्रचाराला परवानगी होती. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजकीय पक्षांची पदयात्रा, सायकल यात्रा किंवा रोड शो करण्यास बंदी घालण्यात आली होती.

10 मार्चला निकाल, कोणत्या राज्याचं कधी मतदान?

उत्तर प्रदेश – 7 टप्प्यात मतदान मतदान केव्हा? – 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च

उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान

मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारीला आणि 3 मार्चला मतदान

संबंधित बातम्या :

पुन्हा “मोदी”वरून खडाखडी, हायकमांडने झापल्यानंतर नानांनी तयार केला कथित मोदी :- खासदार सुनील मेंढे

Goa Assembly Election 2022 : गोव्यात काँग्रेस उमेदवारांनी घेतली शपथ, भाजपचं टेन्शन वाढलं

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण

VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.