AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinesh Phogat Election Result 2024 : काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

Vinesh Phogat Election Result 2024 : दोन महिन्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात विनेश फोगाटच गोल्ड मेडल हुकलं होतं. अगदी काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला फायनलचा सामना खेळता आला नव्हता. विनेश आता राजकारणाच्या मैदानात नशीब आजमावत आहे.

Vinesh Phogat Election Result 2024 : काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर
vinesh phogat
| Updated on: Oct 08, 2024 | 1:51 PM
Share

कुस्तीच्या रिंगमधून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या विनेश फोगाट यांनी बाजी मारली आहे. हरियाणात जुलानामधून त्या काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवत होत्या. विनेश फोगाट यांनी भाजपाच्या कॅप्टन योगेश बैरागी यांचा पराभव केला. भाजपाने जुलानामधून बैरागी यांच्या रुपाने एक दलित चेहरा दिला होता. इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. 14 व्या फेरी अखेर विनेश फोगाट जुलानामधून 5557 मतांनी आघाडीवर होती. फक्त एकच राऊंड बाकी होता. जुलाना विधानसभा मतदारसंघ जिंद जिल्ह्यात येतो. 2005 मध्ये काँग्रेस उमेदवाराने शेवटची जुलानामधून निवडणूक जिंकली होती.

दोन महिन्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात विनेश फोगाटच गोल्ड मेडल हुकलं होतं. अगदी काही ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे विनेशला फायनलचा सामना खेळता आला नव्हता. विनेश ऑलिम्पिक समितीने अपात्र ठरवलं होतं. या निर्णयाला ऑलिम्पिक लवादात आव्हान देण्यात आलं. पण त्याचा फायदा झाला नाही. कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह हटवण्यासाठी सुद्धा विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांनी मोठं आंदोलन केलं होतं.

19 वर्षानंतर काँग्रेसचा विजय

2009 ते 2019 पर्यंत जुलानामधून INLD च्या उमेदवार निवडून आला आहे. 2005 नंतर जवळपास 19 वर्षांनी जुलानामधून विनेश फोगाटच्या रुपाने काँग्रेसला ही जागा जिंकता आली आहे. विनेश फोगाटने निवडणूक जिंकली असली, तरी हरियाणामध्ये भाजपा सत्तेची हॅट्ट्रीक करणार असं चित्र आहे. बातमी लिहिताना भाजपा 50 तर काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.