उमेदवारी जाहीर केली अन् लगेच राऊत म्हणाले तर वेलिंगकरांची उमेदवारी मागे घेणार? उत्पल पर्रिकरांसाठी काय काय करणार?
सुभाषजी वेंलिगकर यांनी अनेक वर्षे आमच्यासोबत विविध माध्यमांतून काम केलं आहे, त्यांचे चिरंजीव शैलेंद्र वेलिंगकर यांना गोव्याच्या उप राज्य प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली.
गोवा – गोव्यात (goa) होणा-या विधानसभेसाठी आज शिवसेनेकडून (shivsena) पहिली यादी जाहीर करण्यात आली, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पहिल्या यादीत 9 उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच उत्पल पर्रीकर (utpal parrikar) यांनी पणजीतून स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली. तर आम्ही शिवसेनेनेची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेऊ असं राऊत जाहीर केले. विशेष म्हणजे आम्ही इतरही पक्षांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले आहेत.
सुभाषजी वेंलिगकर यांनी अनेक वर्षे आमच्यासोबत विविध माध्यमांतून काम केलं आहे, त्यांचे चिरंजीव शैलेंद्र वेलिंगकर यांना गोव्याच्या उप राज्य प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच त्यांची उमेदवारी गोव्यातून जाहीर करण्यात आली. “जर का उत्पल पर्रिकर स्वतंत्र निवडणुक लढविणार असतील, तसेच ते शेवटपर्यंत आपला अर्ज काय ठेवणार असतील, तर आम्ही तिथली उमेदवारी मागे घेऊ असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
उत्पल पर्रिकर यांच्या भाजपकडून होत असलेला अन्याय गोव्याची जनता पाहत आहे. तसेच मनोहर पर्रिकरांनी मुख्यमंत्री असताना गोवा राज्यासाठी मोठं योगदान दिलं आहे हे गोव्याची जनता विसरली नाही. त्यामुळे भाजपने आम्हीचं जिंकू या भ्रमात राहू असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला. निवडणुकीचा निकाल पाहून आम्ही गोव्यात महाराष्ट्रासारखी आघाडी सुध्दा करू, काँग्रेसने गोव्यात आत्मचिंतन कराव अशी परिस्थिती आहे असल्याचे सुध्दा संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी गोव्यात जाणार आहेत. तसेच उत्पल पर्रिकर यांनी स्वतंत्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोव्यातील इतर पक्षांचं सुध्दा मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचं सुध्दा संजय राऊत यांनी सांगितलं.