Assembly Election Result 2022 : येत्या काळात शिवसेनेची अवस्था खूप वाईट होईल, गिरीश महाजनांचा टोला
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणून भाजपला रोखण्याचा शिवसेनेनं आणि पर्यायानं महाविकास आघाडीनं प्रयत्न केला होता. पण, तो प्रयत्न फासल्याचं दिसून आलं. भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत आघाडीवर होते. आता यावर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या काळात शिवसेनेची अवस्था खपू वाईट होईल, असं महाजन यावेळी म्हणाले.
मुंबई : उत्तर प्रदेश, (Uttarakhand Election) गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत (Assembly Result) भाजपला घवघवीत यश मिळालं असून पंजाबमध्ये ‘आप’नं बाजी मारली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणून भाजपला रोखण्याचा शिवसेनेनं आणि पर्यायानं महाविकास आघाडीनं प्रयत्न केला होता. पण, तो प्रयत्न फासल्याचं दिसून आलं. भाजपविरोधात (BJP) मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर होते. आता यावर आणि 5 राज्यांमधील विधानसभेच्या निकालांवर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या काळात शिवसेनेची अवस्था खपू वाईट होईल, असं महाजन यावेळी म्हणाले. शिवसेनेला काही म्हणू दिया. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊता यांनी कमी बोलावं आणि काम जास्त करावं, असा टोलाही महाजन यांनी यावेळी राऊतांना लगावलाय. ही तर फक्त झांकी आहे महाराष्ट्र अभी बाकी आहे, असा इशाराही गिरीश महाजन यांनी यावेळी दिलाय.
ही तर फक्त झलक-महाजन
उत्तर प्रदेश निवडणुकीवर बोलताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्व:पक्षाचं तोंड भरुन कौतुक केलंय. तर जनतेनं योग्य कौल दिल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नेतृत्व जनतेनं कबुल केल्याचंही महाजन यावेळी म्हणालेत. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. या निवडणूक भाजपनं दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या रिंगणात उतरवलं होतं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. तर दुसरीकडे विरोधकांनी भाजपाला रोखण्यासाठी डावपेच खेळला पण, तो त्यांचा फक्त प्रयत्नच असल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रीय महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी यासाठी प्रयत्नशिल होते. पण, शेवटी विरोधकांची एकजुट झाली नाही आणि प्रयत्न फसला. हे शिवसेना नेते संजत राऊतांनी देखील भाजपच्या विजयानंतर मान्य केलं.
महाजनांचे शिवसेनेला खुले आव्हान
पाच राज्यांतील विधानसभा निवणुकांवर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला टोला लगावत, येत्या काळात शिवसेनेची अवस्था आणखी वाईट होईल, असं म्हटलंय. पुढे बोलातना ते म्हणाले, महाराष्ट्रात एकहाती भाजपची सत्ता येईल, आमच्यासोबत दगाफटका केला, असा आरोपही भाजप नेते गिरीश महराजन यांनी यावेळी केला. शिवसेनेनं दोन लोकसभेच्या जागा जिंकून दाखवाव्यात, असं खुल आव्हान महाजन यांनी शिवसेनेला दिलंय.
संबंधित बातम्या