Election Result 2022 Live: कोणत्या राज्यात किती जागा म्हणजे बहुमत?; तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर वाचा एका क्लिकवर

Election Result 2022 उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. काही राज्यात उलथापालथ होताना दिसत आहे. तर काही राज्यात आपली सुभेदारी वाचवण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी होताना दिसत आहेत.

Election Result 2022 Live: कोणत्या राज्यात किती जागा म्हणजे बहुमत?; तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर वाचा एका क्लिकवर
कोणत्या राज्यात किती जागा म्हणजे बहुमत?; तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर वाचा एका क्लिकवरImage Credit source: tv9 hindi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:35 PM

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब (punjab), उत्तराखंड (uttarakhand) आणि मणिपूर (manipur) या पाच राज्यातील निवडणुकीचे कौल हाती येत आहेत. काही राज्यात उलथापालथ होताना दिसत आहे. तर काही राज्यात आपली सुभेदारी वाचवण्यात सत्ताधारी पक्ष यशस्वी होताना दिसत आहेत. पंजाबमध्ये तर आम आदमी पार्टी बहुमताच्या पार गेल्याचं सुरुवातीच्या कलावरून दिसत आहे. तीच स्थिती उत्तर प्रदेशातही आहे. उत्तर प्रदेशात भाजपनेही बहुमताचा आकडा गाठलेला दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्ता राखण्यात भाजप यशस्वी झाल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात बऱ्याच कालावधी नंतर मतदारांनी सत्ताधारी पक्षाला पुन्हा सत्तेची संधी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेच्या जागांचं गणित वेगळं आहे. तसेच प्रत्येक राज्यातील बहुमताचा आकडाही वेगवेगळा आहे. कोणत्या राज्यात किती जागांसाठी बहुमत लागते याचा घेतलेला हा वेध.

उत्तर प्रदेश

  1. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठं राज्य आहे. उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. या राज्यात एकूण सात टप्प्यात मतदान झाले. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेशात मॅजिक फिगर गाठण्यासाठी कोणत्याही सरकार 202 जागांची गरज आहे.

पंजाब

  1. पंजाब हे देशातील एक महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यात सध्या काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे गेली वर्षभर हे राज्य चर्चेत राहिलं. पंजाब विधानसभेत एकूण 117 जागा असून बहुमतासाठी अवघ्या 59 जागांची आवश्यकता आहे.

उत्तराखंड

  1. पंजाबप्रमाणेच उत्तराखंडमध्येही बरीच अस्थिरता पाहायला मिळाली. या राज्यात भाजप सत्ताधारी पक्ष आहे. पण भाजपला गेल्या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलावे लागले. त्यावरून पक्षातील अंतर्गत कलह आणि राज्यातील अस्थिरता दिसून येते. 70 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी अवघ्या 36 जागांची आवश्यकता आहे.

गोवा

  1. गोवा हे सर्वात छोटं राज्य आहे. पण या राज्याने नेहमीच देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. गोव्यातील निवडणूक पूर्वीचं आणि निवडणुकीनंतरच समीकरण नेहमीच वेगळं असतं. त्रिशंकू विधानसभेत तर गोव्याची सर्वच समीकरणे बदलून जात असल्याचं पाहायला मिळतं. गोवा विधानसभेत 40 जागा आहे आणि बहुमतासाठी 21 जागांची आवश्यकता आहे.

मणिपूर

  1. गोव्यानंतर मणिपूरही छोटं राज्य आहे. मणिपूर विधानसभेत एकूण 60 जागा आहेत. पण बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने 21 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर एनपीएफ, एनपीपी आणि एलजीपीशी युती करून सरकार स्थापन केलं होतं.

संबंधित बातम्या:

Assembly Election Results 2022 LIVE Streaming: यूपी, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूरमध्ये कुणाचं सरकार बनणार?; TV9 वर असा पाहा निवडणुकांचा निकाल

Punjab Vidhan Sabha Election 2022 LIVE: पंजाबमध्ये ‘आप’ का झाडू चल गया’, चन्नी, सिद्धू, अमरिंदर, बादल पिछाडीवर

Election Result 2022 Live: मुख्यमंत्र्यांवर पराभवाची टांगती तलवार; सावंत, धामी, बीरेन यांचे काय होणार?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.