Goa Assembly Election 2022 : गोव्यात काँग्रेस उमेदवारांनी घेतली शपथ, भाजपचं टेन्शन वाढलं

आता आणि निवडणुकीनंतर होणारे पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना एकनिष्ठतेची शपथ दिली आहे.

Goa Assembly Election 2022 : गोव्यात काँग्रेस उमेदवारांनी घेतली शपथ, भाजपचं टेन्शन वाढलं
गोव्यातले काँग्रेस उमेदवार
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 5:07 PM

गोवा : देशातल्या पाच राज्यात सध्या निवडणुकांचा (Five State Election) धुरळा उडतोय. राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवार याद्याही जाहीर केल्या आहेत. मात्र निवडणूक आणि याद्या जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांच्या कोलांट्याउड्या सुरू आहेत. अनेकजण पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत, तर काहीजण बंड करत अपक्ष लढण्याचा नारा देत आहेत. गोव्यातली (Goa Assembly election 2022) परिस्थितीही याहून वेगळी नाही, उत्तर प्रदेश आणि गोव्यातही नेत्यांचं इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सुरू आहे. गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal parikar) यांनी बंड करत अपक्ष लढण्याची घोषणा केल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे, फक्त पर्रीकरच नाही तर काही जुन्या नेत्यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अशात काँग्रेसने सावध पवित्रा घेतलाय. कारण काँग्रेसने आपल्या उमेदवारांना पक्ष न बदलण्याच्या थेट शपथा दिल्या आहेत.

काँग्रेस उमेदवारांकडून एकनिष्ठतेची शपथ

आता आणि निवडणुकीनंतर होणारे पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना एकनिष्ठतेची शपथ दिली आहे. शपथ घेताना निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अशी शपथ देवी महालक्ष्मी आणि बांबोळीतील क्रॉससमोर घेतली आहे. त्यामुळे याशपथेनंतर तरी गोव्यातली पक्षांतरे थांबतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. निवडणुका आल्या की कुठल्याही राज्यात पक्षांतराला उत येतो. ज्याचा राजकीय फायदा जिकडे तिकडे तो नेता जाताना दिसून येतो. महाराष्ट्र विधानसभेच्या आधीही अशीच पक्षांतरे दिसून आली होती.

उत्पल पर्रीकरांच्या मनधरणीत भाजपला अपयश

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उत्पल पर्रीकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण उत्पल हे पणजीतुन निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दोन दिवसांपूर्वी गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचे राज्यात पडसाद उमटले होते. 12 जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून उत्पल यांना उमेदवारी दिली पाहिजे, असं म्हणणं पूर्णपणे चूक असल्याचं म्हटलं. पर्रीकरांचा मुलगा आहे, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाणार नाहीच, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. आणि आता उत्पल पर्रीकरांच्या बंडानंतर भाजपचं टेन्शन वाढले आहे.

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं, आम्हाला संविधान वाचवायचं आहे-पृथ्वीराज चव्हाण

VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

सत्तार उद्या शिवसेनेत राहण्याचीच खात्री नाही, दानवेंना नांगरावर पाठवणारा कुणीही नाही, डॉ. भागवत कराड यांची खरमरीत टीका!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.