AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

2022 च्या निवडणुकीत आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळाली पाहिजे नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल परिकर यांनी सांगितले होते.

तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारांना तिकीट देतात, मग मला का नाही? उत्पल पर्रीकर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
देवेंद्र फडणवीस उत्पल पर्रीकर
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 9:48 AM

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचं सध्या चर्चेत आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मोनहर पर्रीकर यांचे ते सुपुत्र आहेत. यावेळच्या निवडणुकीत भाजपकडून (BJP) त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झालंय. पणजीच्या उमेद्वारीवरून आत्ता उत्पल परिकर आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असा नवा वाद रंगलाय. अमित शहा.यांनी समजावऊन देखील उत्पल पर्रीकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पणजीतून भाजपने आमदार बाबुश मोंसरात याना तिकीट देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेले दिवंगत मनोहर परिकर यांचे पुत्र उत्पल परिकर यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, परिकर यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिकर यांना दिल्लीत बोलावून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उत्पल परिकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना उत्पल पर्रीकर यांचं उत्तर

गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की उत्पल परिकर केवळ मनोहर परिकरांचा मुलगा आहे म्हणून पक्ष त्यांना तिकीट देणार नाही. याशिवाय उत्पल यांची वेगळी ओळख आणि कामही नसल्याचे ही फडणवीस पुढे म्हणाले होते. पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपने बाबुश मोंसरात यांना तिकीट देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या उत्पल परिकरांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत तुम्ही बलात्कारी, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पणजीतून तिकीट देऊ शकतात तर माझ्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट का नाही देऊ शकत असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

काय आहे नेमका वाद?

पणजी मतदारसंघात मागच्या 30 वर्षांपासून भाजपचा उमेदवार विजयी होतो. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2019 ला परिकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँगेसचे बाबुश मोंसरात यांचा विजय झाला. मात्र बाबुश पुढे भाजपवासी झाले.

2022 च्या निवडणुकीत आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळाली पाहिजे नाहीतर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल परिकर यांनी सांगितले होते. मनोहर परिकर यांनी पणजीत केलेली विकासकामे, पणजीतून मनोहर परिकर यांना मानणारा त्यांचा मतदारवर्ग आणि पणजी आणि गोव्यासाठी त्यांचे असलेले योगदान याच्या जोरावर त्यांचे पुत्र उत्पल परिकर सध्या भाजपकडून पणजीसाठी तिकीट मागत आहेत.

इतर बातम्या:

VIDEO | बस ड्रायव्हरला फीट, प्रवासी महिलेने स्टेअरिंग सांभाळलं, पुण्यातील रणरागिणीच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक

सावधान.. लहान मुलांनाही होतोय कोरोना! अंबरनाथ, बदलापूरसह औरंगाबादमधील आकडेवारी काय सांगते? तज्ज्ञ म्हणतात

Goa Assembly Election 2022 Utpal Parrrikar ask question to Devendra Fadnavis and decided to contest independent from Panaji

उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
उगवत्या सूर्याप्रमाणे हे समिट चमकत आहे; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच...
रस्त्यात बस थांबवली अन् ड्रायव्हरचं नमाज पठण, व्हिडीओ व्हायरल होताच....
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं.
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल
ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल.
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ....
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.