गोवा भाजपला गळती सुरूच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. प्रवीण झांटेंचा राजीनामा, आतापर्यंत चार जणांनी सोडला पक्ष

गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Goa Assembly Election) भाजपाला धक्के बसत आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार गोव्यामध्ये येत्या 14 फेब्रुवारीला मतदान आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपमधून काही आमदार बाहेर पडले आहेत. आता या यादीमध्ये आणखी एका आमदाराच्या नावाचा समावेश झाला आहे.

गोवा भाजपला गळती सुरूच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आ. प्रवीण झांटेंचा राजीनामा, आतापर्यंत चार जणांनी सोडला पक्ष
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 5:34 PM

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Goa Assembly Election) भाजपाला धक्के बसत आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार गोव्यामध्ये येत्या 14 फेब्रुवारीला मतदान आहे. मात्र त्यापूर्वीच भाजपमधून काही आमदार बाहेर पडले आहेत. आता या यादीमध्ये आणखी एका आमदाराच्या नावाचा समावेश झाला आहे. आमदार प्रवीण झांटे यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेकडून माहिती देण्यात आली. झांटे यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते पक्षातून देखील बाहेर पडले असल्याची माहिती समोर येत आहे.

आतापर्यंत चार आमदारांनी दिला राजीनामा

आमदार प्रवीण झांटे यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यापूर्वी गोव्याचे भाजपा मंत्री मायकल लोबो यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. प्रवीण झांटे यांच्यासह आतापर्यंत भाजपाच्या चार आमदरांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये कार्लोज, अल्मेडिया, एलिना सालदना, मायकल लोबो आणि प्रवीण झांटे यांच्या नावाचा समावेश आहे. हे सर्व आमदार पक्षावर नाराज असल्याची चर्च सुरू आहे. यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता  प्रवीण झांटे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा

दरम्यान यापूर्वी जेव्हा मायकल लोबो यांनी आपल्या मंत्रीपादाचा राजीनामा दिला होता, तेव्हा ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. आता प्रवीण झांटे यांनी देखील राजीनामा दिला आहे. झांटे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच अपक्ष आमदार असलेल्या प्रसाद गावकर यांनी देखील राजीनामा दिला होता. त्यांनी आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. गोव्यामध्ये येत्या 14 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मात्र त्याचपूर्वी गोवा भाजपला गळती लागली आहे. आतापर्यंत एकूण तीन आमदार आणि एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे माणण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

‘यापुढे प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील’, पवारांच्या पत्रकार परिषदेवर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया

पवारांसमोर 22 एस.टी. संघटनेचे नेते कसे होते? सदावर्ते म्हणाले, मला तर तो पवारांचा वाढदिवस वाटला…

सिंधुदुर्गात सेना-भाजप पुन्हा आमनेसामने, उदय सामंतांना भाजप कार्यकर्त्यांचा घेराव

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.