Goa Election | गोव्याचं मोठं यश कुणामुळे? फडणवीसांनी घेतली दोन नावं, गोव्यातल्या सरकारचा प्लॅनही सांगितला
विधानसभा निवडणुकीचे निकाल (Goa Assembly Election) हाती येणार म्हणून गोव्यात कालपासूनच हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. भाजप-काँग्रेस (BJP Vs Congress) या दोन प्रमुख पक्षांत राजकीय चुरस असली तरीही इतर स्थानिक पक्षही किंगमेकर ठरणार, अशी चर्चा होती.
मुंबईः विधानसभा निवडणुकीचे निकाल (Goa Assembly Election) हाती येणार म्हणून गोव्यात कालपासूनच हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला होता. भाजप-काँग्रेस (BJP Vs Congress) या दोन प्रमुख पक्षांत राजकीय चुरस असली तरीही इतर स्थानिक पक्षही किंगमेकर ठरणार, अशी चर्चा होती. मात्र आजच्या निकालांतून भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेससमोर दणदणीत विजय मिळवत भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार, हेही काही वेळात स्पष्ट होईल. गोव्यातल्या या यशाबद्दल भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा केला जात आहे. गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीदेखील या विजयावर प्रतिक्रिया देताना दोन प्रमुख नेत्यांचंच हे श्रेय असल्याचं बोलून दाखवलं. त्यांच्यामुळेच गोव्यात भाजपला बहुमत मिळाल, असं ते म्हणाले.
फडणवीसांनी कोणती दोन नावं सांगितली?
गोव्यात भाजपला लख्ख मिळवून दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील नागरिकांचं अभिनंदन. तसे या विजयाचे श्रेय कुणाचे हे सांगताना ते म्हणाले, ‘ भाजप नेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना गोव्यातील यशाचे श्रेय जाते. मोदींनी देशात जो विश्वास तयार केलाय त्यामुळे गोव्यात ही मतं मिळाली आहेत. लोक म्हणत होते अँटी इन्कबन्सी फॅक्टरचा प्रभाव गोव्यात होईल आणि भाजपला जनता नकार देईल. मात्र तसे झाले नाही. मत विभागूनदेखील नाही तर लोकांनी दिलेल्या पॉझिटिव्ह व्होटवर आम्ही निवडून आलो आहोत. त्यानंतर गोव्यातील या यशाचे श्रेय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही दिले पाहिजे. गोव्यात डबल इंजिन सरकारने जे काम केलं आहे, त्याचाच हा विजय आहे.
गोव्यातलं सरकार कसं असेल?
गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. लवकरच या राज्यात पक्षाच्या वतीने सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. याविषयी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत असले तरीही अनेक अपक्ष आमच्याशी संपर्कात आहेत. आम्ही त्यांनाही सोबत घेणार आहोत. तसेच MGP अर्थात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षदेखील आमच्यासोबत असेल. अर्थात यासंबंधीचा निर्णय ते घेतील. मात्र आम्ही सर्वांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहोत. तसेच सत्ता स्थापनेचा दावा कधी करणार याचा निर्णय सेंट्रल पार्टी घेईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गोव्यातच्या ट्रेंडनुसार भाजप आघाडीवर
गोवा विधानसभा निवडणुकीचे बहुतांश जागांवरील निकाल हाती आले आहेत. काही प्रमाणात मतमोजणी अजूनही सुरु असून सध्याच्या ट्रेंडनुसार, भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप 20, काँग्रेस 11, आप- 02, अपक्ष- 3, मगोप- 2 जागांवर आघाडीवर आहे.
इतर बातम्या-