Goa Election 2022 : गोव्याच्या विधानसभेसाठी उद्या मतदान, 40 जागांसाठी भाजप, काँग्रेससह राजकीय पक्षांनी लावला जोर

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उत्तर प्रदेश, गोवा (Goa), पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. गोवा विधानसभा निवडणूक या वर्षी चर्चेत राहिलीय.

Goa Election 2022 : गोव्याच्या विधानसभेसाठी उद्या मतदान, 40 जागांसाठी भाजप, काँग्रेससह राजकीय पक्षांनी लावला जोर
election 2022
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:29 PM

पणजी : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उत्तर प्रदेश, गोवा (Goa), पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. गोवा विधानसभा निवडणूक या वर्षी चर्चेत राहिलीय. गोव्यातील विधानसभेची सदस्य संख्या 40 इतकी आहे. गोव्यातील प्रचार शनिवारी संपला. राज्यात उद्या एका टप्प्यात 40 जागांवर मतदान होत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावलीय. गोव्यात काँग्रेस, (Congress) मगोप, भाजप (BJP) यांच्यात लढत व्हायची. मात्र, यावर्षी ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं ताकद लावली आहे. गोव्यात सध्या भाजपचं सरकार आहे. गेल्या दहावर्षांपासून गोव्यात भाजप सरकार असून यावेळी मतदार कुणाला कौल देतात हे पाहावं लागणार आहे.

गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमदेवार रिंगणात आहेत. गोव्यातील सत्ता मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनी ताकद लावली आहे. गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रचारात हजेरी लावली. आता गोव्यातील जनता कुणाला सत्ता देणार हे उद्या होणाऱ्या मतदानावरुन ठरणार आहे.

उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीमुळं निवडणूक चर्चेत

देशाची माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पणजी विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी जाहीर केली. भाजपकडून उमेदवारीनं मिळाल्यानं त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. भाजपकडून बाबुश मोन्सेरात यांना उमदेवारी देण्यात आली आहे. बाबूश मोन्सेरात इतर 9 काँग्रेस आमदारांसह भाजपमध्ये सहभागी झाले होते. तिथं आता बाबुश मोन्सेरात विरुद्ध उत्पल पर्रिकर यांच्यात लढत होतं आहे.

काँग्रेसनं लावली ताकद

गेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष हा काँग्रेस होता. मात्र, भाजपनं छोट्या राजकीय पक्षांच्या साथीनं सरकार बनवलं होतं. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसनं यावेळी उमदेवारांना शपथ दिली होती. तर, उमदेवारांकडून पक्ष सोडणार नसल्याचं स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं होतं. यावेळी राहुल गांधी यांनी गोव्यात प्रचार केला होता. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेनं आणि स्थानिक पक्षांनी यावेळी चांगली ताकद लावलीय. गोव्याची जनता कुणाला मत देणार ते उद्या स्पष्ट होईल.

इतर बातम्या :

चंद्रकांत पाटील फार मोठी व्यक्ती, त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यानं बोलणं बरोबर नाही : अजित पवार

Leopard viral video : सोशल डिस्टन्सिंगचं पालन ‘इथं’ही गरजेचं, अन्यथा जीवही जाऊ शकतो!

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....