Goa Election result 2022: तर ते आज आमदार राहिले असते, उत्पल पर्रिकारांच्या पराभवावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
गोव्यात पुन्हा भाजप सत्तेत (Goa election Results 2022) येताना दिसतंय. त्यानंतर निवडणुकीत गोवा भाजपचे प्रभारी असणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्पल पर्रीकर (Utpal Manohar Parrikar) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : गोवा विधानसभेचे निकाल हाती आल्यानंतर एक्झिट पोलचा अंदाजही खोटा ठरला आहे. कारण एक्झिट पोलने गोव्यात कुठल्याच राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाहा असे भाकीत वर्तवले होते. मात्र गोव्यात पुन्हा भाजप सत्तेत (Goa election Results 2022) येताना दिसतंय. त्यानंतर निवडणुकीत गोवा भाजपचे प्रभारी असणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्पल पर्रीकर (Utpal Manohar Parrikar) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. उत्पल पर्रीकर यांनी बंडखोरी करत पणजीतून निवडणूक लढवली मात्र त्यांचा दारून पराभव झाला. निवडणुकी आधी भाजपने त्यांना दुसऱ्या जागांचा पर्याय सुचवला होता. मात्र इतर ठिकाणाहून लढण्यास त्यांनी नकार दिला होता. गोव्यात जे काही निकाल येत आहेत. तिथे संपूर्ण बहुमताकडे आम्ही जात आहोत. याचं श्रेय गोव्यातील जनतेला आणि आमचे नेते नरेंद्र मोदी यांना आहे, असे सांगताना फडणवीसांनी उत्पल पर्रीकरांना टोले लगावले आहेत.
तर उत्पल पर्रीकर आमदार असते
बाबूश विजय होणार हे पहिल्या दिवशीच स्पष्ट होतं. त्याचा मला आनंद आहे. पण उत्पल पर्रिकर पराभूत झाल्याचा आनंद मी व्यक्त करत नाही. ते आमच्याच परिवारातील आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज ते आमदार असते. असे म्हणत त्यांनी जखमेवर मीठ चोळलं आहे. तसेच गोव्यात डबल इंजिन सरकारने काम केलं. त्यामुळे गोव्यात मोठा विजय भाजपला मिळतोय. आम्हाला बहुमत मिळत असलं तरी काही अपक्षांना आम्ही सोबत घेणार आहोत. एमजीपीलाही आम्ही सोबत घेणार आहोत. अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाची परवानगी घेऊन आम्ही दावा करु, असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातही तयारी सुरू केलीय
तसेच महाराष्ट्राबद्दल बोलताना महाराष्ट्रात आम्ही 2024 ची तयारी केलीय. आम्ही सरकार पाडणार नाही. पण सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सरकार देऊ, असे सूचक विधान फडणवीसांनी केले आहे. गोव्यात मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे. तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं पाहिली तरी ती नोटापेक्षा कमी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली. तिथे त्यांच्या उमेदवाराला 97 मतं आहेत. असे म्हणत फडणवीसांनी शिवसेनेचे वाभाडे काढले आहेत. तर काँग्रेसला आत्मचिंतन करायची गरज आहे. विशेषत: परिवारवादी पार्ट्यांना हा मोठा संदेश आहे, असेही ते म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis | उत्पल पर्रिकरांचा पराभव, भाजपचा विजय, तरीही फडणवीसांना आनंद का नाही?
गोव्यात जे पर्रिकर, गडकरींना नाही जमलं ते फडणवीसांनी करुन दाखवलं! महाराष्ट्रात जोर वाढणार?
Goa Election Result 2022 | कोणाला 49, कोणाला 55, सर्वाधिक 342, गोव्यात शिवसेना उमेदवारांना किती मतं?