Goa Election Result 2022 | कोणाला 49, कोणाला 55, सर्वाधिक 342, गोव्यात शिवसेना उमेदवारांना किती मतं?
गोव्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असून काही ठिकाणी डिपॉझिटही जप्त होण्याची चिन्हं आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात किती मतं (Shivsena Candidates Votes) पडली आहेत, यावर एक नजर
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांचे निकाल (Goa Elections result 2022) हाती आले आहेत. भाजप 19 जागांवर आघाडीवर असून तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. तर काँग्रेसही दहा जागांवर पुढे आहे. मात्र गोव्यात भाजप-काँग्रेस यांच्याशिवाय शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. गोव्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असून काही ठिकाणी डिपॉझिटही जप्त होण्याची चिन्हं आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात किती मतं (Shivsena Candidates Votes) पडली आहेत, यावर एक नजर
मतदारसंघ – उमेदवाराचे नाव – मतं (दुपारी दोन वाजेपर्यंत)
हळदोणा- गोविंद गोवेकर – 342 कुडतरी- भक्ती खडपकर – 55 मांद्रे – बबली नाईक – 116 म्हापसा – जितेश कामत – 123 पेडणे- सुभाष केरकर – 223 पर्ये – गुरुदास गावकर – 267 केपे – अॅलेक्सी फर्नांडिस – 66 साखळी – सागर धारगळकर – 97 शिवोली – करिष्मा फर्नांडिस – 166 वाळपई – देवीदास गावकर – 183 वास्को – मारुती शिरगावकर – 49
कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?
आप {6.80%} तृणमूल काँग्रेस {5.23%} भाजप {33.40%} गोवा फॉरवर्ड पक्ष {1.83%} काँग्रेस {23.21%} महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष {7.76%} राष्ट्रवादी {1.09%} नोटा {1.12%} शिवसेना {0.18%} इतर {19.38%}
संबंधित बातम्या :
गोव्यात भाजपला तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा : सूत्र
गोव्याचे मुख्यमंत्री हरता-हरता जिंकले, दोन्ही ‘आयाराम’ उपमुख्यमंत्री पडले
शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त, रावसाहेब दानवेंकडून शिवसेनेच्या मर्मावर बोट