Goa Panaji Election: शिवसेनेकडून ‘आरएसएस’चा शिलेदार मैदानात, भाजपच्या बाबूशना टक्कर, उत्पल पर्रिकरांकडे आता लक्ष!

शैलेंद्र वेलिंगकर यांच्यासारखा मोठा मासा गळाला लागल्यावर शिवसेनेने आपले शब्द फिरवले आणि पणजीतून शैलेंद्र यांना उमेदवारी दिली. आता पणजीतून भाजप विरोधात शिवसेना अशी जंगी लढत पहायला मिळणार आहे. मात्र नाराज झालेले उत्पल पर्रीकर आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Goa Panaji Election: शिवसेनेकडून 'आरएसएस'चा शिलेदार मैदानात, भाजपच्या बाबूशना टक्कर, उत्पल पर्रिकरांकडे आता लक्ष!
शैलेंद्र वेलिंगकर, बाबूश मॉन्सेरात, उत्पल पर्रीकर
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 1:04 PM

पणजीः गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव-नवीन घडामोडी समोर येत आहेत. विशेष म्हणजे राजधानी पणजी मतदार संघ आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांच्याकडे गोवेकरांचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांना पणजीमधून उमेदवारी दिली नसल्याचे जाहीर केले. भाजपकडून बाबूश मॉन्सेरात हे पणजीतून उमेदवार आहेत. त्यातच आज शिवसेनेने आरएसएसचे शिलेदार आणि गोव्यातील सामाजिक चळवळींचा नेता शैलेंद्र वैलिंगकर यांना पणजीतून उमेदावरी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज झालेले उत्पल पर्रीकर आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेने उतरवला RSS चा तगडा उमेदवार

गोवा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात प्रथमच उतरत असलेल्या शिवसेनेने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गोव्यातील ज्येष्ठ राजकीय नेते सुभाष वेलिंगकर यांचे चिरंजीव आणि RSS चे शिलेदार शैलेंद्र वेलिंगकर यांना पणजीतून उमेदवारी देण्याचे शिवसेने जाहीर केले आहे. शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावर शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनाची प्रमुख जबाबदारीदेखील सोपवली आहे. भाजपच्या बाबूश मॉन्सेरात यांच्याविरोधात शिवसेनेने तगडा उमेदवार उतरवला आहे.

भाजपकडून बाबूश मॉन्सेरात पणजीतून लढणार!

गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी काल गोव्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात पणजी मतदारसंघातून अतनासिओ उर्फ बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं. मात्र उत्पल पर्रीकर यांनी मॉन्सेरात यांच्या नावाला विरोध केला होता. मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली तर मी गप्प बसणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला होता. मात्र भाजपने उत्पल पर्रीकर यांना दोन जागांचा पर्याय दिला असून त्यापैकी एका जागेसाठी त्यांनी नकार दिला असून दुसऱ्या जागेविषयी त्यांची समजूत घालणं सुरु आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

सेनेनं शब्द फिरवला, आता उत्पल यांची भूमिका काय?

काहीही झालं तरी पणजीतून उत्पल पर्रीकर यांचा पाठींबा देणार असं शिवसेनेनं याआधी जाहीर केलं होतं. मात्र आता शैलेंद्र वेलिंगकर यांच्यासारखा मोठा मासा गळाला लागल्यावर शिवसेनेने आपले शब्द फिरवले आणि पणजीतून शैलेंद्र यांना उमेदवारी दिली. आता पणजीतून भाजप विरोधात शिवसेना अशी जंगी लढत पहायला मिळणार आहे. मात्र नाराज झालेले उत्पल पर्रीकर आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या-

Goa Assembly Elections 2022 : भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार? वाचा एका क्लिकवर

Latur Crime | पती जिवंत असताना केलं अजब काम, लातूरमध्ये संपत्ती लाटण्यासाठी पत्नीचा गजब कारनामा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.