Goa Liberation Day | 60व्या मुक्तिदिनी गोव्याला पंतप्रधानांनी दिलं 600 कोटीचं गिफ्ट, गोव्याला उद्देशून मोदी म्हणाले की…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गोवा मुक्तीलढ्या भाग घेतलेल्या आणि बलिदान दिलेल्या 31 हुतात्म्यांचीही आठवण काढली. तसंच यावेळी त्यांनी दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या आठवणींनाही उजाळा दिलाय.

Goa Liberation Day | 60व्या मुक्तिदिनी गोव्याला पंतप्रधानांनी दिलं 600 कोटीचं गिफ्ट, गोव्याला उद्देशून मोदी म्हणाले की...
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:05 PM

पणजी : गोवा मुक्तिदिनाच्या (Goa Liberation Day) हीरक महोत्सव पणजीसह संपूर्ण राज्यात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मुक्तिदिनानिमित्त गोव्यात हजेरी लावत गोव्यातील जनतेला संबोधित केलंय. वेगवेगळ्या प्रकल्पांचं गोव्यात मोदींच्या हत्ये अनावरण करण्यात आलं. त्यावेळी मोदींनी गोव्यासाठी 60व्या मुक्तिदिनानिमित्त तब्बल 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं शुभारंभ गोव्यात केल्याचा दावा केलाय. यात आग्वाद किल्यातील संग्रहालय (Agonda Fort), गोवा मेडिकल कॉलेजमधील (Goa Medical Collage) सुपर स्पेशालिटी ब्लॉक, दक्षिण गोव्यातील (South Goa) नव्या जिल्हा रुग्णालयासह मोपा विमानतळातील कौशल्य विकास केंद्र आणि दवर्ली, नावेलीसह मडगावातील (Margaon) गॅस इन्सुलेटेड उपकेंद्राचंही उद्घाटन केलं.

पोतुर्गीजांच्या सावटातही भारतीयत्व गोव्यानं जपलं

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये गोवा मुक्तिदिनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोव्यातील जनतेला उद्देशून मोदींनी कौतुकौद्गार काढले आहेत. ते म्हणाले की,

भारताच्या इतर भूभागात जेव्हा मुघलांची सत्ता होती, तेव्हा गोव्यात पोर्तुगीज राज्य करत होते. पोर्तुगींजांच्या सावटाखाली राहूनही गोव्यातील जनतेनं त्यांची भारतीयत्व जपलंय. वेगवेगळ्या सत्तांतरातून गोवा गेलाय. भारताच्या एकात्मतेचा गोवा एक आदर्श भाग आहे. भारत एक अशी भावना आहे, ज्या राष्ट्राला प्रथम प्राधान्य आहे. या देशच एकच संकल्प आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत!

बलिदान दिलेल्यांना सलाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गोवा मुक्तीलढ्या भाग घेतलेल्या आणि बलिदान दिलेल्या 31 हुतात्म्यांचीही आठवण काढली. तसंच यावेळी त्यांनी दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या आठवणींनाही उजाळा दिलाय. पर्रीकरांनी गोव्याची क्षमता,गोव्याचा विकास यावर मोलाचं काम केल्याचं मोदींनी यावेली म्हटलंय. गोव्यातील लोकं किती मेहनती, प्रतिभावान आणि प्रामाणिक असल्याची प्रतिमा संपूर्ण देशानं पर्रीकरांमध्ये पाहिली आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

निवडणुकांवरही मोदींचा डोळा?

गोव्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारकडून वेगवेगळ्या विकासकामांचा शुभारंभ केला जातो आहे, असंही बोललं जातंय. दिल्लीतल बडे नेते गोव्यात वारंवार हजेरी लावत असून गेल्या काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी, प्रियंका गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासारखे अनेक दिग्गज नेत्यांचे दौरे गोव्यात झालेत. अशातच आता नरेंद्र मोदींनीही गोवा मुक्तिदिनाचा मुहूर्त साधत गोव्यात हजेरी लावली आहे. भाजपा गोव्यात सत्ता स्थापन करताना नेहमी साथ देणारा एमजीपी हा सुदिन आणि दीपक ढवळीकरांचा पक्षानं भाजपसोबत युती करण्यास नकार दिलाय. निवडणुकीआधीच गोव्यात आलेल्या नवख्या तृणमूल काँग्रेससोबत एमजीपीनं युती केल्यानं आगामी काळात भाजपची रणनिती काय असणार, याकडेही गोव्यासह देशातील राजकीय जाणकारांची नजर लागली आहे.

मोदींचं संपूर्ण भाषण पाहण्यासाठी इथं क्लिक करा- 

इतर बातम्या – 

VIDEO: नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, बढाया मारत नाही; नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचले

Golden Temple | पावित्र्य भंग केल्याचं प्रकरण! गोल्डन टेम्पलनंतर आता ‘इथं’ही संशयिताला इतकं मारलं की तो मेलाच

स्नो फॉल नाही, तर पावडरची गळती! एचपीसीएलच्या प्लान्टमधला प्रकार

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.