Goa Elections 2022 : गोवा निवडणुकीच्या मैदानात राहुल गांधी, घरोघरी प्रचाराला हिंदी गाण्यांची जोड
गोवा विधानसभा (Goa Elections 2022) निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते राहुल (Rahul Gandhi) गांधी थेट मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. गोवा दौर्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी मुरगाव विधानसभा मतदान क्षेत्रातील सडा या ठिकाणी घरोघरी जाऊन काँग्रेसचा प्रचार केला.
मुंबई : पाच राज्यात सध्या निवडणुकांचे (Five State Election 2022) चौघडे वाजत आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारतोफा धडाडत आहेत. गोवा विधानसभा (Goa Elections 2022) निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेसचे नेते राहुल (Rahul Gandhi) गांधी थेट मैदानात उतरलेले पाहायला मिळाले. गोवा दौर्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी मुरगाव विधानसभा मतदान क्षेत्रातील सडा या ठिकाणी घरोघरी जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. घरोघरी प्रचार करताना राहूल गांधी यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री पी, चीदंबरम आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे होते. राहूल गांधी यांनी घरोघरी जात त्यांनी मतदारांशी संवाद साधला. गोव्यात भाजपची कोंडी करण्यासाठी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्ष सध्या चांगलाच जोर लावत आहे.
हिंदी गाणी ऐकत राहुल गांधींचा प्रचार
गोव्या दौऱ्यावरती असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. घरोघरी जाऊन प्रचार करत असताना डूलबा वळवईकर यांच्या घरात ते गेले. इथं वळवईकर यांच्या कुटुंबासोबत एका हिंदी गाण्यांचा देखील आस्वाद घेतला. राहुल गांधी आणि वळवईकर कुटुंबामध्ये बराच वेळ चर्चाही झाली. गोव्यात भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने मैदानत उतरले आहे. त्यातच काँग्रेसनेही धडाडीने प्रचार सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शाह गोव्यात आले होते, त्यावेळी काँग्रेवर तोफा डगल्या होत्या. आता राहुल गांधी अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेच्या जाळ्यात भाजप फसणार?
दुसरीकडे उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देत गोव्यात भाजपला चेकमेट देण्यासाठी राऊतांनी हे जाळं टाकलं आहे. यात आता भाजप फसणार ही शिवसेनेचे हे जाळं तोडून पणजीचा गड राखणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र शिवसेने उमेदवार मागे घेतल्याने आणि उत्पल पर्रीकरांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपसाठी निवडणूक नक्कीच कठिण झालीय. फक्त गोव्यातच नाही तर उत्तर प्रदेशातही भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तर प्रदेशात गड राखण्यासाठी योगी आदित्य आणि भाजप पूर्ण जोर लावताना दिसून येत आहे. त्यामुळे इतर राज्यांपेक्षा जास्त लक्ष या दोन राज्यांकडे आहे.