Goa Poll: राष्ट्रवादीची शिवसेनेशी आघाडी, उद्या पटेल, आव्हाड गोव्यात जाऊन चर्चा करणार

गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड उद्या गोव्यात जाऊन आढावा घेणार आहेत.

Goa Poll: राष्ट्रवादीची शिवसेनेशी आघाडी, उद्या पटेल, आव्हाड गोव्यात जाऊन चर्चा करणार
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 4:43 PM

मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड उद्या गोव्यात जाऊन आढावा घेणार आहेत. त्यानंतर शिवसेनेशी जागा वाटपावर चर्चा करून अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. निवडणुकांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार उत्तर प्रदेशात आमची समाजवादी पार्टीशी आघाडी झाली आहे. सपाने आम्हाला एक जागा सोडली असून अजूनही काही जागा सोडण्याची शक्यता आहे. मणिपूरमध्येही काँग्रेससोबत आघाडी झाली आहे. गोव्यात आघाडी करण्याबाबत काँग्रेससोबत चर्चा झाली होती. पण काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाची आघाडीची इच्छा नाही. त्यामुळे उद्या प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड दोन्ही नेते गोव्यात जाणार आहे. शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत आघाडीची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा होईल. त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असं मलिक म्हणाले.

राऊत काय म्हणाले?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीसोबत आघाडी करून गोव्यात लढणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच काँग्रेसकडून राष्ट्रवादीला अपेक्षित जागा सोडल्या जात नव्हत्या, असंही राऊत यांनी म्हटलं होतं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी माझी चर्चा झाली. स्थानिक स्तरावरही चर्चा झाली. दिगंबर कामत, दिनेश गुंडूराव, गिरीश तोडणकर यांच्याशी चर्चा केली. त्यांचा सकारात्मक सूर असला तरी जागा वाटपाच्यावेळी त्यांच्या अडचणी येतात. आम्हाला दोन-तीन जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी नक्कीच ठेवला होता. आमची चर्चा झालीच नाही. चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही असं मी म्हणणार नाही. चर्चा झाली. आम्हाला त्यांनी काही जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आमच्यासोबत राष्ट्रवादीही आहे. त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. महाविकास आघाडी जेव्हा आपण बोलतो तेव्हा केवळ शिवसेना राहत नाही. राष्ट्रवादी आहे. त्यांना कोणत्या जागा हव्यात, ते कोणत्या जागांवर लढू इच्छितात यावर चर्चा होणं गरजेचं आहे. ती होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसला शुभेच्छा दिला, असं राऊत म्हणाले होते.

राष्ट्रवादीला जागा सोडत नव्हते

ज्या जागा राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या सोडायला काँग्रेस तयार नाही. काँग्रेस गोव्यातील मोठा पक्ष आहे. काँग्रेस अनेक वर्ष सत्ताधारी पक्ष होता. मागच्यावेळी त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. 17 आमदार त्यांचे निवडून आले होते. आता त्यांच्याकडे दोन तीन आमदार राहिले आहेत. त्यांना वाटतं लोकांचा पाठिंबा अजून त्यांना आहे. असेल तर दिसेल. आम्हाला वाटत होतं की, काँग्रेसने 40 पैकी 30 जागा लढाव्यात. उरलेल्या दहा जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डला द्याव्यात असं आम्हाला वाटत होतं. या दहा जागांवर आमचं समाधान झालं होतं, असंही ते म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

गोव्यातील राजकारण प्रस्थापितांच्या हाती गेलं, आम्ही सर्वसामान्यांना उमेदवारी देणार: संजय राऊत

VIDEO: फडणवीसांना गोव्याची हवा लागली, त्यांचं अध:पतन झालंय; संजय राऊतांची खोचक टीका

VIDEO: काँग्रेसला गोव्यात 40 पैकी 45 जागा मिळतील, महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर राऊतांचा सणसणीत टोला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.