भाजपाने पणजीमधून तिकीट का नाकारले?, उत्पल पर्रिकर म्हणतात…

उत्पल पर्रिकर यांना भाजपाकडून पणजीमधून विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र भाजपाकडून त्यांना पणजीमधून तिकीट नाकारण्यात आले. दरम्यान आपल्याला तिकीट का नाकारण्यात आले यावर उत्पल यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाने पणजीमधून तिकीट का नाकारले?, उत्पल पर्रिकर म्हणतात...
उत्पल पर्रिकर
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 6:41 PM

मयूरेश गणपत्ये – पणजी :  उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांना भाजपाकडून पणजीमधून विधानसभा निवडणूक (Panaji Assembly Election) लढण्याची इच्छा होती. मात्र भाजपाकडून (bjp) त्यांना पणजीमधून तिकीट नाकारण्यात आले. त्याऐवजी त्यांना अन्य दोन विधानसभा मतदारसंघांचा पर्याय देण्यात आला होता. मात्र उत्पल पर्रीकर हे पणजीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याने त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान भाजपाने आपल्याला तिकीट का नाकारले यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  भाजपाने मला पणजीमधून तिकिट नाकारलं कारण मी मतदारसंघात फारसा सक्रिय नसल्याचे त्यांना वाटत होते. पणजी मतदारसंघातील विधानसभा निवडणूक अपेक्षेप्रमाणेच टफ होणार आहे. मात्र मी तेथील जनतेला एक पर्याय देऊ इच्छितो असे उत्पल यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार बाबुश मोंसेरेट यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. बाबुश यांनी गेल्या पाच वर्षांत पणजीमध्ये कोणती विकास कामे केली असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.

निवडणूक पैशाच्या जोरावर जिंकली जाते

पुढे बोलताना उत्पल पर्रिकर म्हणाले की, पणजी मतदारसंघात अनेक समस्या आहेत. पार्कीगं आणि ड्रेनेज या दोन मुख्य समस्या आहेत. मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पणजीमध्ये पायाभूत सुविधांचा आभाव आहे. मात्र सध्या राजकारण अशा टप्प्यावर आहे, की आज निवडणूका या विकासाच्या मुद्द्यावर नाही तर पैशांच्या जोरावर जिंकल्या जातात. मला हे सर्व बदलायचे आहे. म्हणून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पणजीची निवडणूक ही पैशांच्या जोरावर नाही तर नितीमुल्यांच्या जोरावर होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

भाजपा सोडण्याचा निर्णय कठिण होता

भाजपा सोडण्याचा निर्णय हा माझ्यासाठी खूप कठिण होता. मला पणजीमधून निवडूण यायचे आहे, म्हणून मी हा निर्णय घेतला नाही. तर पणजीमध्ये काहीतरी चुकीचे घडत आहे. ते मला बदलायचे आहे. यासाठी मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मला पूर्ण खात्री आहे की जनता मझ्या पाठिशी उभी राहील. पुढील पाच वर्ष तरी मी अपक्षच राहणार असल्याचेही उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

किरीट सोमय्या म्हणाले, जय पवार यांचे कारनामे उघड करणार; अजित पवार म्हणतात, महत्त्व देण्याची गरज नाही

Video: ज्या टिपू सुलतानवर भाजप-सेनेत राडा होतोय, त्याच्याबद्दल राष्ट्रपती कोविंद नेमकं काय म्हणाले होते? काँग्रेस नेत्याकडून व्हिडीओ ट्विट

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....