Gujarat Assembly Election 2022 Result: गुजरात निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया
Gujarat Assembly Election 2022 Result: गुजरातचा निकाल पाहून मोदींचे पहिले शब्द आहेत....
अहमदाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजपाचे आमदार मोठ्या संख्येने जाणार आहेत. गुजरात निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवलं आहे. गुजरातमध्ये जनतेने आपला कौल भाजपाच्या पारड्यात टाकला आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार आहे. 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपाला पराभूत करणं विरोधकांना शक्य झालेलं नाही.
काँग्रेसचा दारुण पराभव
182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत सध्या भाजपा 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसच या निवडणुकीत अत्यंत दारुण पराभव झालाय. फक्त 17 जागा काँग्रेसच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. हवा निर्माण करणाऱ्या आम आदमी पार्टीला फक्त 5 जागा मिळू शकतात.
Thank you Gujarat. I am overcome with a lot of emotions seeing the phenomenal election results. People blessed politics of development and at the same time expressed a desire that they want this momentum to continue at a greater pace. I bow to Gujarat’s Jan Shakti.
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2022
मोदींची पहिली प्रतिक्रिया
“थँक्यू गुजरात. जबरदस्त निवडणूक निकालामुळे माझ्या मनात अनेक भावना निर्माण झाल्या आहेत. विकासाच्या राजकारणाला लोकांनी आशिर्वाद दिलाय. त्याचवेळी हीच गती कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केलीय. गुजरातच्या जनशक्तीला माझं नमन” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.