सत्तेत आल्यास तीन महिन्यात आम्ही जातीनिहाय जनगणना करू; या पक्षाची मोठी घोषणा
उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.
उत्तर प्रदेश – पाच राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून देशात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यापैकी युपीच्या राजकारणावरती अनेकजण लक्ष ठेऊन आहेत. कारण मागच्या काही दिवसांपासून भाजपला (BJP) गंच्छची लागली आहे तर, भाजपकडून ओबीसी (OBC) कार्ड खेळले गेले आहे. त्यामुळे भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये (SAMAJWADI PARTY) अटीतटीची लढत होईल असं जाणकारांकडून म्हटलं जातंय.
हे सगळं सुरू असताना अखिलेख यादव यांनी युपीत मुळ मुद्याला हात घातल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करू अशी घोषणा केल्याने अखिलेश यादव यांनी सामान्य माणसाच्या नाडी ओळखली आहे असं म्हणता येईल. घेतलेला निर्णय समाजवादी पक्षाला किती फायद्याचा ठरतोय हे काही दिवसात स्पष्ट होईल.
सद्याचे भाजपचे मंत्री दारा सिंह चौहान यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. त्याचं पध्दतीने अखिलेश यांच्याकडून त्यांचं स्वागतही करण्यात आलं आहे. ते योगी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री म्हणून काम करत होते. तसेच ‘अपना दलाचे आमदार डॉ. आरके वर्मा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यालयात दोन्ही आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.
सद्याचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अखिलेश यादव यांच्याकडून वारंवार टीका केली जात आहे. योगी कोणत्या मतदार संघातून निवडणुक लढवतील असा प्रश्न अनेक दिवसांपासून पेंडिंग होता. परंतु त्यानी गोरखपूर हा मतदारसंघ निवडल्याने त्यांनी आता तिथेच राहावे असा खोचक टोला अखिलेश यादव यांनी मारला आहे.
403 जागांसाठी रणसंग्राम उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.