Karnataka Election Results 2023 : निकाल कर्नाटकाचा, पडसाद महाराष्ट्रात, शरद पवार यांच्याकडून महत्वाचे संकेत

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना शरद पवारांनी एक महत्वाच पाऊल उचललं. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकरणही अजून रंगतदार होणार आहे.

Karnataka Election Results 2023 : निकाल कर्नाटकाचा, पडसाद महाराष्ट्रात, शरद पवार यांच्याकडून महत्वाचे संकेत
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 2:29 PM

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यश मिळवलय. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. भाजपाचा कर्नाटकमध्ये पराभव झालाय. कर्नाटकात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना होईल, असा एक्झिट पोलचा अंदाज होता. पण प्रत्यक्ष मतदारांनी कौल मात्र वेगळा दिलाय. सत्ताधारी भाजपाचा या राज्यात दारुण पराभव झालाय. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे भाजपा विरोधात असलेल्या पक्षांनाही बळ मिळालय.

खासकरुन महाराष्ट्रात काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयाचे पडसाद उमटलेला पहायला मिळू शकतात. महाविकास आघाडी अधिक बळकट होईल, अशी शक्यता आहे.

शरद पवारांकडून महत्वाचे संकेत

मागच्या काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच चित्र निर्माण झालं होतं. महाविकास आघाडी फुटेल अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. पण कर्नाटकच्या निकालानंतर महाविकास आघाडी अधिक भक्कम होऊ शकते. यांचे संकेत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

पवारांनी कोणाशी चर्चा केली?

दुपारपर्यंत कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. त्याशिवाय पवारांनी काँग्रेस नेत्यांसोबत सुद्धा फोनवरुन संवाद साधला. लवकरच महाविकास आघाडीची मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. मतभेद वाढत होते

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आहे. अलीकडे या तिन्ही पक्षात मतभेद वाढत असल्याच चित्र निर्माण झालं होतं. पण कर्नाटक निवडणूक निकालानंतर चित्र बदलू शकतं. सध्या राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्याआधी महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर होती. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यामुळे मागच्यावर्षी महाविकास आघाडी सरकार कोसळलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.