Bharatiya Janata Party

देशातील दोन प्रमुख पक्षांपैकी भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे. भाजप 2014पासून केंद्रातील सत्तेत आहे. 21 ऑक्टोबर 1951 रोजी भारतीय जनसंघाच्या नावाने या पक्षाची सुरुवात झाली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते.

देशातील दोन प्रमुख पक्षांपैकी भारतीय जनता पार्टी हा एक पक्ष आहे. भाजप 2014पासून केंद्रातील सत्तेत आहे. 21 ऑक्टोबर 1951 रोजी भारतीय जनसंघाच्या नावाने या पक्षाची सुरुवात झाली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. 1951-52मध्ये झालेल्या देशातील पहिल्या निवडणुकीत संघाने भाग घेतला होता. यावेळी पक्षाला तीन जागांवर विजय मिळाला होता. 1977मध्ये जनसंघाने इतर पक्षांशी युती केली. यावेळी जनता पार्टीची स्थापना करणअयात आली. जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने द्विसदस्य प्रणालीला बंदी घातली. त्यामुळे अनेक लोकांनी पार्टी सोडली. कारण जनसंघ जनता पार्टीचाही सदस्य होता आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचाही. 

6 एप्रिल 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावाने नवीन पक्ष स्थापन करण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी बीजेपीचे पहिले संस्थापक अध्यक्ष बनले. 1980 मध्ये भाजपला त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळाला. 2014मध्ये भाजपने संपूर्ण बहुमत मिळवलं. भाजपला 282 जागांवर विजय मिळाला. तर 2019मध्ये 303 जागांवर विजय मिळाला. 

1990च्या दशकात अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात राम मंदिराचं आंदोलन सुरू करण्यात आलं. त्यामुळे जनसामान्यात भाजपचा जम बसला. भाजपला 100 हून अधिक जागांवर विजय मिळवता आला. हळूहळू पक्ष बहुमताकडे आला. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. भाजपमधून पहिले पंतप्रधान होण्याचा मान वाजपेयींना मिळाला. पहिल्यांदा ते 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले. बहुमत न मिळाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. 1998मध्ये दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. एक वर्षानंतर 1999मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीए पहिल्यांदा बहुमतासह सत्तेत आला. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. वाजपेयी सरकारमध्ये आडवाणी उपपंतप्रधान होते. 

2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपल्या बळावर बहुमत मिळवलं. भाजपच्या नेतृत्वात एनडीएला 336 जागा मिळाल्या. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. 2019मध्येही भाजपला मोठा विजय मिळाला. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. 2019मध्ये भाजपला 303 तरा एनडीएला 350 जागा मिळाल्या होत्या. सलग दहा वर्ष पंतप्रधानपदी असलेले मोदी हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. 

भारतातील प्रमुख राजकीय पक्ष(India's Major Political Parties)
Party Name Party Logo Party President Party Establishment Year
Bharatiya Janata Party JP Nadda April 1980
Indian National Congress Mallikarjun Kharge December 1885
Aam Aadmi Party Arvind Kejriwal November 2012
Bahujan Samaj Party Mayawati April 1984
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar June 2023
ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) Uddhav Thackeray June 2022
निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ