AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर लोकसभा निकाल 2024: अहमदनगरमध्ये निलेश लंके यांची आघाडी

ahmednagar Lok Sabha Election Result 2024 News in Marathi: 2019 मध्ये भाजपने दिलीप गांधी ऐवजी सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. परंतु त्यानंतर भाजपची विजयाची परंपरा चालू राहिली. सुजय विखे यांनी विक्रमी 704,660 मते घेत विजय मिळवला तर विरोधी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली.

अहमदनगर लोकसभा निकाल 2024: अहमदनगरमध्ये निलेश लंके यांची आघाडी
सुजय विखे निलेश लंके
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 6:02 PM

अहमदनगर शहरातील मतमोजणी संपली आहे. निलेश लंके यांना 74263 मते तर सुजय विखे 1 लाख 5 हजार 849 मते मिळाली आहेत. नगर शहरात विखे यांना 31586 मतांची आघाडी आहे. परंतु 22 व्या फेरीत निलेश लंके यांची 18,355 मतांची आघाडी आहे. निलेश लंके यांना 5 लाख 60 हजार 134 मते मिळाली. सुजय विखे यांना 5,41,779 मते मिळाली.

अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपचे सुजय विखे यांना 1 लाख 31 हजार 211मते तर महाविकास आघाडीचे निलेश लंके यांना 1 लाख 21 हजार 348 मते मिळाली आहेत. पाचव्या फेरी अखेर दोन्ही उमेदवारांमध्ये ‘कांटे की टक्कर’ सुरु आहे. पाचव्या फेरी अखेर सुजय विखे यांना 9863 मतांनी आघाडीवर आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मंगळवार मतमोजणी झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) दुरंगी लढत झाली. महायुतीकडून डॉ. सुजय विखे पाटील (BJP Sujay Vikhe Patil) आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके (NCP Nilesh Lanke) यांच्यात लढत झाली. निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार होते. परंतु निवडणुकीपूर्वी ते शरद पवार गटात दाखल झाले. त्यानंतर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. एक खासदार तीन आमदारांसह अहमदनगर मतदार संघावर भाजपचे प्राबल्य आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड मतदार संघ येतात.

अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा इतिहास (ahmednagar Lok Sabha Seat Winner History)

2009 पासून अहमदनगर मतदार संघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 2009 मध्ये भाजपकडून दिलीपकुमार मनसुखलाल गांधी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा दिलीप गांधीच विजयी झाले. त्यांना 605,185 मते मिळाली तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजीव राजळे यांना 3,96,063 मते मिळाली होती. त्यानंतर 2019 मध्ये भाजपने दिलीप गांधी ऐवजी सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. परंतु त्यानंतर भाजपची विजयाची परंपरा चालू राहिली. सुजय विखे यांनी विक्रमी 704,660 मते घेत विजय मिळवला तर विरोधी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 4,23,186 मते मिळाली.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.