Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडी लोकसभा निकाल 2024 : भिवंडीमध्ये मतदारांनी तुतारी फुंकली, सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामाची विजयी घोडदौड

Bhiwandi Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात धक्कदायक निकाल लागला आहे. मतदारांनी तुतारीला साथ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचा दणदणीत विजय झाला आहे. दोन वेळा खासदारकी मिळालेले भाजपचे उमेदवार कपिल पाटील दारूण पराभव झाला. 

भिवंडी लोकसभा निकाल 2024 : भिवंडीमध्ये मतदारांनी तुतारी फुंकली, सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामाची विजयी घोडदौड
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 8:08 PM

लोकसभा निवडणूक 2024 ची मतमोजणी पूर्ण झाली असून देशभरातसह महाराष्ट्रातील निकालही समोर आले आहेत. राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात धक्कदायक निकाल लागला आहे. मतदारांनी तुतारीला साथ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांचा दणदणीत विजय झाला आहे. दोन वेळा खासदारकी मिळालेले भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा दारूण पराभव झाला.  सुरेश म्हात्रे यांना 4 लाख 99 हजार 464 इतकी मतं मिळाली तर भाजपच्या कपिल पाटील यांच्या पारड्यात 4 लाख 33 हजार 343 इतकी मतं पडली. कपिल पाटील यांचा 66 हजार 121 मतांनी पराभव झाला.

पाचव्या टप्प्यात २० मे रोजी देशभरासह महाराष्ट्रात मतदान पार पडले. भिवंडी, नाशिक, मुंबई यासह महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मतदान झालं. भिवंडीत मविआतर्फे राष्ट्रवादीला जागा मिळाली आणि सुरेश म्हात्रे अर्थात बाळ्यामामाला राष्ट्रवादीने तिकीट दिलं. तर महायुतीतर्फे ही जागा भाजपच्या पारड्यात पडली आणि कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा संधी दिली. भिवंडीत दुहेरी लढत होईल असं वाटत असताना निलेश सांबरेंनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने ही लढत तिहेरी झाली.

दोघांमध्ये काटे की टक्कर 

कपिल पाटील यांना भाजपाने 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळेला संधी दिली होती. ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यंदाही ते विजय मिळवत हॅटट्रिक साधतात का याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. तर पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीनेही तुल्यबळ उमेदवार दिला. सुरेश म्हात्रे हे भिवंडीतील स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आगरी समाजाचा पाठिंबा आहे. आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाळ्या मामा अर्थात सुरेश म्हात्रेंनी मनसेत प्रवेश केला. मात्र कपिल पाटील यांनी त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हरवलं. ज्यानंतर त्यांनी पुन्हा मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि शिवसेनेत प्रवेश केला. सुरेश म्हात्रे यांनी 2014 ते 2024 या दहा वर्षांत सातवेळा पक्ष बदलले आहेत. भिवंडीकरांनी तुतारीला कौल देत सुरेश म्हात्रे यांच्या पारड्यात मतं टाकली

या जागेच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर 2009 मध्ये येथे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसने सुरेश तावरे यांना तर भाजपने जगन्नाथ पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर मनसेने देवराज म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश तावरे यांना 1,82,789 तर भाजपच्या जगन्नाथ पाटील यांना 1,41,425 मते मिळाली होती. तर मनसेचे देवराज मात्रे यांना 1,07,090 मते मिळाली. काँग्रेस आणि भाजपच्या विजय आणि पराभवात 41 हजार 364 मतांचा फरक होता.

भिवंडी किती टक्के मतदान ?

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी ठाणे जिल्ह्यातही मतदान झालं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 पासूनच मतदानाला सुरूवात झाली. भिवंडी मतदारसंघात एकूण 59.89 % मतदान झालं.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण
माझी सही सोप्पी आहे, कोणीही करतं; आशिष विशाळ प्रकरणात धसांच स्पष्टीकरण.
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला
निवडणुकीत मतं विकत घेण्यासाठी 1500चं दुकान लावलं; राऊतां टोला.
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले
काय विचारावं याचं तारतम्य तर ठेवा; शरद पवार चिडले.
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.