महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, गोविंदा, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार, काँग्रेसचाही बडा नेता शिवसेनेच्या गळाला

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दिग्गांचा पक्षप्रवेश होणार आहे. यामध्ये बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिना कपूर आणि करिष्मा कपूर यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक बडा नेता देखील मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, गोविंदा, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार, काँग्रेसचाही बडा नेता शिवसेनेच्या गळाला
गोविंदा हिरो, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 4:28 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आज दिग्गजांचे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अभिनेत्री करिना कपूर, अभिनेत्री करिष्मा कपूर, अभिनेता गोविंदा यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील काँग्रेसचा आणखी एक बडा नेते हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम हे देखील आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री याबाबत उल्लेख करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा हिरोला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोविंदा याआधी काँग्रेस पक्षाचा खासदार देखील राहिला आहे. तो लोकसभा निवडणूक याआधी निवडून आला आहे. त्यानंतर तो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असून त्याला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर या दोन्ही बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जावून भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांचादेखील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

गोविंदाला उमेदवारी मिळाल्यास जिंकून येणार?

शिवसेना शिंदे गटाकडून नुकतंच काल स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एकूण 40 नेत्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या स्टार प्रचारकांमध्ये बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री देखील असतील का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेकलाकारांवर नागरीक खूप मनापासून प्रेम करतात. त्यांच्या कामावर लोक प्रेम करतात. त्यामुळे त्याचा फायदा राजकारणात देखील होऊ शकतो. गोविंदा हिरो प्रेक्षकांच्या प्रेमामुळे याआधी खासदार म्हणूनही निवडून आलाय. त्यामुळे आता पुन्हा प्रेक्षक त्याला उमेदवारी मिळाली तर लोकसभेला पाठवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संजय निरुपम काँग्रेसमध्ये नाराज

काँग्रेस नेते संजय निरुपम हे पक्षाचे माजी खासदार आहेत. ते राज्यसभेचेदेखील खासदार होते. त्यांची मुंबईत चांगली ताकद आहे. पण महाविकास आघाडीत त्यांचा दावा असलेल्या जागेवर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केल्याने संजय निरुपम हे नाराज झाले आहेत. त्यांनी आपण ठाकरे गटाच्या उमेदवाराचं काम करणार नाही, हे कालच जाहीर केलं होतं. त्यानंतर ते आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.