लोकसभा निवडणूक निकाल 2024 उमेदवार Candidate Wise Vote Counting

भारतीय लोकशाहीच्या निर्वहनासाठी भारतीय संविधानात दोन तऱ्हेच्या व्यवस्था दिल्या आहेत. एक म्हणजे लोकसभा आणि दुसरी म्हणजे राज्यसभा. लोकसभेत 543 सदस्य असून हे सदस्य थेट लोकांमधून निवडले जातात. या सभागृहाचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो. तसेच या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच सर्वसाधारण निवडणुका घेऊन नव्या सदस्यांची निवड केली जाते. लोकसभेला संसदेचं कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं. अशाच प्रकारचं दुसरं सभागृह राज्यसभा आहे. राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी या सभागृहातील सदस्यांची निवड करतात. राज्यांच्या लोकसंख्येच्या आधारे लोकसभेच्या जागा निश्चित केल्या जातात. देशात लोकसभेची पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली होती.

प्रमुुख उमेदवारांची यादी 2024

देशात लोकशाही अस्तित्वात आली तेव्हा लोकसभेची सदस्य संख्या 500 होती. देशाची लोकसंख्या वाढल्यानंतर काळानुसार परिसीमन करण्यात आलं. शेवटचं परिसीमन 2008मध्ये झालं होतं. त्यानंतर देशातील लोकसभेच्या 573 जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. पुढील परिसीमन आता 2026मध्ये होणार आहे. एका अंदाजानुसार नव्या परिसीमनानंतर देशात लोकसभेच्या 78 जागा वाढणार आहेत. अंदाजानुसार, दक्षिणेत तामिळनाडूत 9, केरळमध्ये 6, कर्नाटकात दोन आणि आंध्रप्रदेशात 5 जागा वाढतील. त्याचप्रकारे तेलंगनात दोन, ओडिशात 3, गुजरातमध्ये 6, उत्तर प्रदेशात 14, आणि बिहारमध्ये 11 जागा वाढण्याची शक्यता आहे. तर, छत्तीगडमध्ये एक, मध्यप्रदेशात 5, झारखंडमध्ये एक, राजस्थानात 7 आणि हरियाणा आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन जागा वाढण्याचा अंदाज आहे. सध्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. वाराणासीतून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उत्तर प्रदेशातील लखनऊमधून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत. तर 26 लोकसभा जागा असलेल्या गुजरातमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विजयी झालेले आहेत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक 48, पश्चिम बंगालमध्ये 42 आणि बिहारमध्ये 40 जागा आहेत. तामिळनाडूत 39 जागा आहेत.

प्रश्न – केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा काय?

उत्तर – केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी 272 जागांची आवश्यकता असते.

प्रश्न – 2019मध्ये वाराणासी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना किती टक्के मते मिळाली होती?

उत्तर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणासी लोकसभा मतदारसंघातून एकूण मतांपैकी 63.62% (674,664) मते मिळाली होती.

प्रश्न – उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक जागा असलेलं राज्य कोणतं?

उत्तर – उत्तर प्रदेशानंतर (80) सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 48 जागा आहेत.

प्रश्न- बिहारमध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?

उत्तर – बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत.

प्रश्न- ईव्हीएमवर विश्वास ठेवला जाऊ शकतो का?

उत्तर – होय… याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळल्या आहेत. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं हे अजूनही कोणीच सिद्ध करू शकलेलं नाही.

प्रश्न- 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष कोणता?

उत्तर – भाजप आणि काँग्रेसनंतर डीएमकेने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या होत्या.

प्रश्न- अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीला 2019मध्ये किती जागा मिळाल्या होत्या?

उत्तर – केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला केवळ एका जागेवर विजय मिळाला होता. पंजाबच्या संगरूर लोकसभा मतदारसंघातून हा विजय मिळाला होता. आपचे उमेदवार भगवंत मान हे निवडून आले होते.

प्रश्न- 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी वाड्रा यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती?

उत्तर – प्रियंका गांधी वाड्रा यांनी तेव्हा निवडणूक लढवली नव्हती.

प्रश्न- देशाच्या तिसऱ्या पंतप्रधानांचं नाव काय होतं?

उत्तर – इंदिरा गांधी या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या.

प्रश्न- राजीव गांधी यांच्यानंतर पंतप्रधानपदी कोण बसलं?

उत्तर – राजीव गांधी यांच्यानंतर व्हीपी सिंह देशाचे पंतप्रधान होते.

प्रश्न- सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा मान कुणाला मिळाला?

उत्तर – पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. नेहरू तब्बल 17 वर्ष पंतप्रधान पदावर होते.

निवडणूक बातम्या 2024
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर या कामांना पहिली प्राथमिकता
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
'तो' पुन्हा आला, या 5 गुणांमुळे फडणवीस पुन्हा आले
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? शिरसाट यांच्याकडून महत्त्वाची अपडेट
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी...' जिव्हारी लागणारा वार
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्रीपदावरुन शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्याचं मोठं वक्तव्य
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
'माझा पक्ष, माझे वडिल', पार्थ यांनी NCP च्या कुठल्या आमदाराला सुनावलं
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
मुख्यमंत्री आणि काळजीवाहू मुख्यमंत्र्यामध्ये फरक काय असतो?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
EVM विरोधात विरोधकांचा एल्गार? पवारांच्या नेतृत्वातील बैठकीत ठरलं काय?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
भाजपच्या महाविजयासाठी पडद्यामागून खेळी करणारे शिव प्रकाश कोण?
निवडणूक व्हिडिओ