छत्तीसगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting
छत्तीसगडला धान्याचं कोठार म्हणूनही ओळखलं जातं. तसा छत्तीसगडचा इतिहास फार जुना नाही. 24 वर्षापूर्वीच छत्तीसगडची निर्मिती झाली. 1 नोव्हेंबर 2000मध्ये मध्यप्रदेशाचं विभाजन करून स्वतंत्र छत्तीसगड राज्याची निर्मिती करण्यात आली. हे राज्य 135,194 वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रफळात विस्तारलेलं आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 2.55 कोटी आहे. छत्तीसगडच्या सीमा सात राज्यांना लागून आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, ओडिशा आणि उत्तर प्रदेशाला लागून या राज्याच्या सीमा आहेत. रायपूर राज्याची राजधानी आहे. व्यापार, अर्थव्यवस्था आणि प्रशासनाचं केंद्र म्हणून छत्तीगडकडे पाहिले जाते. विद्यूत आणि स्टिलच्या उत्पादनाच्या बाबत हे राज्य अत्यंत महत्त्वाचं आहे. महानदी, हसदेव, शिवनाथ, अरपा, इंद्रावती, मांड, सोंढूर आणि खारून आदी नद्या या राज्यातून वाहतात. छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा आहेत. त्यात पाच जागा राखीव आहेत. यात चार जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
छत्तीसगड लोकसभा मतदारसंघाची यादी
राज्य | जागा | उमेदवार | वोट | पक्ष | स्टेटस |
---|---|---|---|---|---|
Chhattisgarh | Bastar | MAHESH KASHYAP | - | BJP | Won |
Chhattisgarh | Korba | JYOTSNA CHARANDAS MAHANT | - | INC | Won |
Chhattisgarh | Durg | VIJAY BAGHEL | - | BJP | Won |
Chhattisgarh | Kanker | BHOJRAJ NAG | - | BJP | Won |
Chhattisgarh | Raipur | BRIJMOHAN AGRAWAL | - | BJP | Won |
Chhattisgarh | Mahasamund | ROOP KUMARI CHOUDHARY | - | BJP | Won |
Chhattisgarh | Surguja | CHINTAMANI MAHARAJ | - | BJP | Won |
Chhattisgarh | Bilaspur | TOKHAN SAHU | - | BJP | Won |
Chhattisgarh | Raigarh | RADHESHYAM RATHIYA | - | BJP | Won |
Chhattisgarh | Janjgir-Champa | KAMLESH JANGDE | - | BJP | Won |
Chhattisgarh | Rajnandgaon | SANTOSH PANDEY | - | BJP | Won |
देशातील नवीन राज्यांमध्ये छत्तीसगडची गणना होते. 1 नोव्हेंबर 2000 रोजी छत्तीसगडची स्थापना झाली आणि देशाच्या नकाशावर 26 वे राज्य म्हणून सामील झाले. छत्तीसगड हा पूर्वी मध्य प्रदेशचा भाग होता. छत्तीसगडच्या नावाबाबत असे म्हटले जाते की, एकेकाळी या भागात 36 किल्ले असायचे, त्यामुळे त्याचे नाव छत्तीसगड पडले. विशेष म्हणजे नंतरच्या काळात किल्ल्यांची संख्या वाढली पण नावात कोणताही बदल झाला नाही आणि आज त्याला छत्तीसगड म्हणतात.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने छत्तीसगडला महत्त्वाचे स्थान आहे. काही महिन्यांपूर्वी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आणि 5 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा सत्तेत परतले.भाजपला मोठा विजय मिळाल्याने मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित करण्यात बराच वेळ लागला. भाजपने आदिवासी नेते विष्णुदेव साई यांना मुख्यमंत्री केले. भाजपचा हा निर्णय सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा मोठा डाव मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी उत्कृष्ट होती आणि त्यांनी 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवली, तर काँग्रेसला सुमारे 41 टक्के मते मिळाली. यावेळी भाजप केंद्रात हॅट्ट्रिक करण्यासाठी एनडीए 400 पार करण्याचा नारा देत आहे, अशा परिस्थितीत भाजपला छत्तीसगडमध्ये चमकदार कामगिरी करावी लागेल.
प्रश्न - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये भाजपला किती टक्के मते मिळाली?
उत्तर – 50.70%
प्रश्न - 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळाल्या?
उत्तर - 2 जागा जिंकल्या
प्रश्न - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी कशी होती?
उत्तरः 11 पैकी 10 जागा जिंकल्या.
प्रश्न - छत्तीसगडमध्ये SC-ST साठी किती जागा राखीव आहेत?
उत्तर - 5 जागा
प्रश्न - विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात भाजपने कोणाला उमेदवारी दिली?
उत्तर : भाजपने लोकसभेचे खासदार विजय बघेल यांना उमेदवारी दिली होती.
प्रश्न - गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कोणत्या खासदाराचा पराभव झाला?
उत्तरः चित्रकूटमधून काँग्रेस खासदार दीपक बैज यांना पराभवाचा सामना करावा लागला.
प्रश्न - 2019 मध्ये विजय बघेल कोणत्या जागेवरून खासदार म्हणून निवडून आले?
उत्तर - दुर्ग लोकसभा जागा
प्रश्न - 2019 च्या निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?
उत्तरः 11 पैकी 9 जागा जिंकल्या.
प्रश्न - केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह कोणत्या मतदारसंघातून खासदार आहेत?
उत्तर - सुरगुजा लोकसभा जागा
प्रश्न - छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?
उत्तर - अजित जोगी