Jalgaon Election Final Result 2024: सर्वात मोठा सस्पेन्स अखेर संपला, जळगावात स्मिता वाघ तब्बल इतक्या मतांनी विजयी
Jalgaon Lok Sabha Election Final Result 2024: जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा जवळपास 2 लाख मतांनी विजय झाला आहे. स्मिता वाघ यांचा अतिशय घवघवीत मतांनी विजय झाला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी स्मिता वाघ यांना टफ फाईट दिली. त्यांना 3 लाख 33 हजार 288 मतं मिळाली. तर स्मिता वाघ यांना तब्बल 5 लाख 25 हजार 600 मतं मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. या निकालावर महाराष्ट्रातील राजकारणाच्या अनेक घडामोडी अवलंबून आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उतारचढाव झाले. या उतारचढाव नंतर आता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्थिर होते का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच. त्याआधी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय हालचाली या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कोणत्या गटाला सर्वसामान्य नागरिकांना भरघोस प्रतिसाद दिलाय हे लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विधानसभेत त्या अनुषंगाने राजकीय गणितं बांधली जाण्याची शक्यता आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ हा त्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे. कारण जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमनेसामने होते. दोन्ही पक्षांच्या बाजूने कडक फाईट आहे. कारण मतदारसंघात दोन्ही उमेदवारांकडून जोरदार ताकद लावण्यात आली.
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा खरंतर भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात 1991 पासून भाजपचे उमेदवार जिंकून आले आहेत. फक्त 1998 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उल्हास पाटील जिंकून आले होते. पण 1999 ला झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला होता. तेव्हा प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झालाय. पण गेल्या लोकसभा निवडणुका आणि यावर्षी पार पडलेल्या निवडणुका यामध्ये फरक आहे. कारण गेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. पण यावेळी शिवसेनेत फूट पडली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झालाय. तसेच शिंदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं मिळालं आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाची स्थापना केली. त्यांनी पक्षाला मोठं केलं. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असताना त्यांच्याहातून पक्षाचं नाव आणि चिन्हं गेल्याने त्यांच्याबाजून एक मोठी सहानुभूती महाराष्ट्रात पाहायला मिळाली. पण या सहानुभूतीचं रुपांतर मतदानात किती झालं ते आता स्पष्ट होत आहे.
जळगाव लोकसभेचा निकाल काय?
जळगावात यावर्षी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार विरुद्ध भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. जळगावमध्ये भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं उमेदवारीचं तिकीट भाजपने कापल्यामुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा नगरपरिषदेचे माजी नरराध्यक्ष करण पवार यांनीदेखील ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर करण पवार यांना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. करण पवार यांना राजकारणाचा मोठा वारसा आहे. त्यामुळे भाजप नेत्या स्मिता वाघ यांच्याविरोधात ही स्ट्राँग लढत ठरली आहे. अतिशय चुरशीची ही लढत राहिली. अखेर आता जळगावचा निकाल समोर आला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा जवळपास 2 लाख मतांनी विजय झाला आहे. स्मिता वाघ यांचा अतिशय घवघवीत मतांनी विजय झाला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी स्मिता वाघ यांना टफ फाईट दिली. त्यांना 3 लाख 33 हजार 288 मतं मिळाली. तर स्मिता वाघ यांना तब्बल 5 लाख 25 हजार 600 मतं मिळाली आहेत. स्मिता वाघ या तब्बल 1 लाख 92 हजार 312 मतांनी विजयी झाल्या आहेत. स्मिता वाघ यांच्यासाठी हा विजय अत्यंत भावनिक आहे. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना जाहीर झालेली उमेदवारी रद्द करण्यात आली होती. पण तरीही स्मिता वाघ या पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांच्या एकनिष्ठतेचं फळ आता त्यांना मिळालं आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, अमळनेर विधानसभा मतदारसंघ, एरंडोल विधानसभा मतदारसंघ, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ, पाचोरा विधानसभा मतदारसंघ हे सहा मतदारसंघ येतात. या प्रत्येक मतदारसंघात कुणाला किती मतं मिळणार ते आज स्पष्ट होत आहे.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स