नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार निवडणूक निकाल Final Result 2024: धुळे, नाशिक, दिंडोरी, नंदुरबारात धक्कादायक निकालाचे संकेत, जळगाव-रावेर भाजपकडे
Nashik, Dhule, jalgaon, Nandurbar north maharashtra Region Lok Sabha Election Results 2024 LIVE Counting and Updates in Marathi : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील सहा मतदार संघात मतमोजणीला आठ वाजता सुरुवात होणार आहे. जळगाव, रावेर, धुळे, नाशिक, दिंडोरी, नंदुरबार या लोकसभा मतदार संघात कोण विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूक 2024 ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पाच टप्पात झाली होती. त्यानंतर आज 4 जून रोजी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील सहा मतदार संघात मतमोजणीला आठ वाजता सुरुवात होणार आहे. जळगाव, रावेर, धुळे, नाशिक, दिंडोरी, नंदुरबार या लोकसभा मतदार संघात कोण विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात मुख्यत: महाविकास आघाडी अन् महायुतीमध्ये लढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट…
LIVE NEWS & UPDATES
-
Nashik Lok Sabha Election Results: नाशिकमध्ये राजभाऊ वाजे 1,61,103 मतांनी विजयी
- राजाभाऊ वाजे 1,61,103 मतांनी विजयी
- शेवटच्या फेरीचे निकाल जाहीर
- हेमंत गोडसे यांना 453414
- राजाभाऊ वाजे 614517
- शंतिगिरी म्हाराज यांना 44415 मते
-
Dindori Lok Sabha Election Results: केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार दिंडोरीत पराभूत
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे लढत झाली. त्यात भारती पवार पराभूत झाल्या. दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांचे नाशिक येथील सीबीएस सिग्नल वर ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.
-
-
Dhule Lok Sabha Election Results: धुळ्यात ‘कांटे की टक्कर’
- धुळे लोकसभा काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना पाच लाख 79 हजार 172 मते
- सुभाष भामरे यांना पाच लाख 71 हजार 381 मते
- अठराव्या फेरी अखेर काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव 7791 मतांनी आघाडीवर
-
Nandurbar Lok Sabha Election Results: नंदुरबार लोकसभेत काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली
- नंदुरबार लोकसभेत काँग्रेसने पुन्हा मुसंडी मारली आहे.
- काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांनी एक लाख ५९ हजार ४२ मतांनी विजयी झाले.
- विजयानंतर काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येत आहे.
- काँग्रेसने आपला गड पुन्हा ताब्यात घेतला आहे.
- नंदुरबार जिल्ह्यात ज्या पक्षाच्या खासदार असतो देशात त्याचेच सरकार येते गोवाल पाडवी यांच्या विश्वास
- नंदुरबार लोकसभा निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती मात्र जनशक्तीच्या विजय झाला आहे
- प्रियंका गांधी यांनी घेतलेल्या सभेमुळे काँग्रेसच्या वातावरण निर्माण झालं होतं
-
Nashik Lok Sabha Election Results: राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा थेट स्वित्झर्लंडमध्ये जल्लोष
राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा थेट स्वित्झर्लंडमध्ये जल्लोष करण्यात आला. स्वित्झर्लंडमध्ये फिरायला गेलेल्या सिन्नरच्या मतदारांकडून थेट स्वित्झर्लंडमध्ये घोषणाबाजी करत विजय साजरा केला.
-
-
Dhule Lok Sabha Election Results: धुळ्यात दोन्ही उमेदवार मतमोजणी स्थळी
मतमोजणी केंद्रावर खासदार सुभाष भामरे आले आहेत. तसेच काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव या देखील मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या आहेत. विजयाचे अंतर जास्त नाही. यामुळे फेर मतमोजणी करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.
-
Jalgaon Lok Sabha Election Results: रक्षा खडसे यांना 193943 मतांची आघाडी
- रावेर आतापर्यंत मिळालेली मते
- रक्षा खडसे 484598
- श्रीराम पाटील 290655
- 193943 एवढा मतांचा लीड रक्षा खडसे
- 251498 मतमोजणी बाकी
-
Nashik Lok Sabha Election Results: राजाभाऊ वाजे यांचा विजय जवळपास निश्चित
नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांचा विजय जवळपास निश्चित आहे. 21 व्या फेरी आखिरी राजाभाऊ वाजे यांना जवळपास 1 लाख 56 हजाराचा लीड मिळाली आहे.
-
Jalgaon and Raver Lok Sabha Election Results: जळगाव, रावेरमध्ये भाजप विजयाच्या उंबरठ्यावर
- जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांची विजयाकडे वाटचाल
- जळगाव लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांचा जवळपास दोन लाखांचे मताधिक्य
- रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे 1 लाख 35 हजार 862 मतांनी आघाडीवर
-
Jalgaon Lok Sabha Election Results: स्मिता वाघ विजयाच्या उंबरठ्यावर
- जळगाव लोकसभेत महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ विजयाच्या उंबरठ्यावर
- जळगाव लोकसभा (अधिकृत आकडेवारी)
- 26 पैकी 16 फेरी पूर्ण
- स्मिता वाघ (महायुती) – 4 लाख 57 हजार 481
- करण पवार (महाविकास आघाडी) – 2 लाख 76 हजार 901
- स्मिता वाघ 1 लाख 80 हजार 580 मतांनी आघाडीवर
-
Raver Lok Sabha Election Results: रावेरमध्ये 141262 मतांनी आघाडीवर
- रावेर लोकसभा मतदार संघात 13 वी फेरी आतापर्यंत पूर्ण झाल्या
- रक्षा खडसे 353937
- श्रीराम पाटील 218075
- 141262 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर
-
Nashik Lok Sabha Election Results: नाशिकमध्ये वाजे यांना १४५१३४ आघाडी
- नाशिक लोकसभा मतदार संघ १८ वी फेरी
- राजाभाऊ वाजे ४९६८७६
- हेमंत गोडसे ३५१७४२
- लीड १४५१३४
-
Dhule Lok Sabha Election Results: धुळ्यात पुन्हा भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर
धुळे मतदार संघामध्ये 15 व्या फेरीच्या मतमोजणी अखेर भाजप 4 हजार मतांनी पुढे
काँग्रेसच 18 हजार मताधिक्य कमी करत 4000 मतांनी भाजपचे सुभाष भामरे पुढे
-
Nandurbar Lok Sabha Election Results: नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी 15 फेरी अंती 105916 आघाडीवर
- नंदुरबार लोकसभा मतदारसंघ 15 फेरी अंती मिळालेली मते
- भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित – 338544
- काँग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी – 474460
- काँग्रेसचे गोवाल पाडवी 15 फेरी अंती 105916 आघाडी
-
Jalgaon Lok Sabha Election Results: जळगावात स्मिता वाघ 1 लाख 48 हजार 902 मतांनी आघाडीवर
- जळगाव लोकसभा मतदार संघ 13 फेरी पूर्ण
- स्मिता वाघ (महायुती) – 3 लाख 70 हजार 33
- करण पवार (महाविकास आघाडी) – 2 लाख 21 हजार 431
- स्मिता वाघ 1 लाख 48 हजार 902 मतांनी आघाडीवर
-
Jalgaon Lok Sabha Election Results: जळगावात भाजपचा मोठा जल्लोष
- जळगावच्या भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष
- जळगावमधून महायुतीचे दोघेही उमेदवार आघाडीवर
- स्मिता वाघ रक्षा खडसे एक लाखाच्या मताधिक्यांनी पुढे
- भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर गुलाल उधळत ठेका धरला
- भाजप आमदार सुरेश भोळे यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून जल्लोष केला
-
Dindori Lok Sabha Election Results: राज्यमंत्री राहिलेल्या भारती पवार दिंडोरीत पिछाडीवर
- केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या भारती पवार दिंडोरीत पिछाडीवर
- सलग बारा फेऱ्या भारती पवार पिछाडीवर
- दिंडोरी मतदारसंघात भाजपाच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे लढत
- बाराव्या फेरी अखेर महाविकास आघाडीचे भास्कर भगरे 40 हजार 40 मतांनी आघाडीवर
-
Dhule Lok Sabha Election Results: धुळ्यात शोभा बच्छाव यांची मुसंडी
धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये 11 व्या फेरीमध्ये काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांची मुसंडी
भाजपाचा 12 हजार मतांचा लीड तोडत 12 हजार मतांनी घेतली आघाडी
अटीतटीच्या लढाईमध्ये भाजपची धाकधूक वाढली
-
Jalgaon Lok Sabha Election Results: जळगाव जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व
- जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचा पाहायला मिळत आहे
- जळगाव लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे करण पवार विरुद्ध महायुतीच्या स्मिता वाघ यांच्यात लढत पार पडत आहे.
- जळगाव लोकसभेत सात फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यात 96 हजार 677 मतांनी महायुतीच्या स्मिता वाघ आघाडीवर
- तर रावेर लोकसभेमध्ये महायुतीच्या रक्षा खडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात लढत पार पडत आहे.
- रावेर लोकसभेमध्ये सात फेऱ्या पूर्ण झाल्या असून 73 हजार 685 मतांनी महायुतीच्या लक्षात असे आघाडीवर आहे
- रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीपासून आतापर्यंत महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे
-
Nandurbar Lok Sabha Election Results: नंदुरबारमध्ये गोवल पाडवी यांची विक्रमी आघाडी
नंदुरबार लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी याना पंधरावी फेऱ्यात १ लाख ३९ हजार मताने आघाडी घेतली आहे.
-
Jalgaon Lok Sabha Election Results: जळगावात स्मिता वाघ यांची आघाडी कायम
- जळगाव लोकसभा मतदार संघ
- करण पवार- 160565
- स्मिता वाघ – 281297
- 120732 मतांनी स्मिता वाघ
-
Raver Lok Sabha Election Results: रक्षा खडसे यांची आघाडी कायम
- रावेर लोकसभा मतदार संघ पाचवी फेरी
- रक्षा खडसे. 206569
- श्रीराम पाटील- 131143
- 75426 मतांनी रक्षा खडसे.
-
Nashik Lok Sabha Election Results: राजाभाऊ वाजे ९४७६० मतांनी आघाडीवर
- नाशिक लोकसभा मतदार संघ १० वी फेरी
- राजाभाऊ वाजे २८३००८
- हेमंत गोडसे १८८२४८
- लीड ९४७६०
-
Dindori Lok Sabha Election Results: दिंडोरीत भास्कर भगरे आघाडीवर
- कळवण, येवला, निफाड,दिंडोरी,या चार अजित पवारांचे आमदार असलेल्या मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवाराला सर्वाधिक मते
- शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्या नांदगाव आणि भाजपचे राहुल आहेर यांच्या चांदवड मतदार संघातून महायुतीच्या भारती पवार सर्वाधिक मतदान
- भारती पवार यांना दोनच मतदारसंघातून सार्वधिक मते
- सलग सहा फेऱ्या भास्कर भगरे आघाडीवर
- दिंडोरी लोकसभा भारती पवारांसाठी प्रतिष्ठेची
-
Nashik Lok Sabha Election Results: राजाभाऊ वाजे 71332 मतांनी आघाडीवर
- नाशिक लोकसभा मतदार संघ
- राजाभाऊ वाजे 223221
- हेमंत गोडसे 151889
- आघाडी – 71332 मतांनी राजाभाऊ वाजे आघाडीवर
-
Nandurbar Lok Sabha Election Results: काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी एक लाख मतांनी आघाडीवर
काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांना आठवी फेऱ्यात १ लाख ०५ हजार मतांनी आघाडी मिळाली आहे.
-
Dhule Lok Sabha Election Results: सुभाष भामरे 14,280 मतांनी आघाडीवर..
- धुळे लोकसभा मतदार संघ
- पाचव्या फेरी अखेर भाजपाचे सुभाष भामरे 14,280 मतांनी आघाडीवर
- सुभाष भामरे -1लाख 80 हजार 907
- शोभा बच्छाव -1लाख 66 हजार 627..
- 14 हजार 280 मतांनी सुभाष भामरे पुढे
-
Nashik Lok Sabha Election Results: राजाभाऊ वाजे यांना ५०८७९ हजारांची आघाडी
- नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये सहावी फेरी
- राजाभाऊ वाजे १६८३५१
- हेमंत गोडसे ११७४७२
- लीड ५०८७९
-
Nashik Lok Sabha Election Results: राजाभाऊ वाजे तिसऱ्या फेरी अखेर 30599 मतांनी पुढे
- नाशिक लोकसभा मतदार संघ तिसऱ्या फेरी अखेर
- हेमंत गोडसे – 58218
- राजाभाऊ वाजे – 88817
- राजाभाऊ वाजे तिसऱ्या फेरी अखेर 30599 मतांनी पुढे
-
Jalgaon Lok Sabha Election Results: जळगावात भाजपच्या स्मिता वाघ मोठ्या आघाडीवर
जळगाव लोकसभा मतदार संघात पहिल्या आणि दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या फेरीत भाजपच्या स्मिता वाघ मोठ्या आघाडीवर आहेत.
- तिसरी फेरी सुरू
- करण पवार (महाविकास आघाडी) – 59986
- स्मिता वाघ (महायुती) – 108426
- स्मिता वाघ यांची 48 हजार 440 मतांनी आघाडी
-
Raver Lok Sabha Election Results: रक्षा खडसे 60 हजार मतांनी आघाडीवर
रावेर लोकसभा तिसरी फेरी
- श्रीराम पाटील (महाविकास आघाडी) – 66382
- रक्षा खडसे (महायुती) – 127243
- 60 हजार 861 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर
-
Raver Lok Sabha Election Results: रावेरमध्ये रक्षा खडसे आघाडीवर
- रावेर लोकसभा मतदार संघ, दुसरी फेरी
- श्रीराम पाटील (महाविकास आघाडी) – 29 हजार 725
- रक्षा खडसे (महायुती) – 48 हजार 816
- 19 हजार 091 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर
-
Dhule Lok Sabha Election Results: धुळ्यात डॉक्टर सुभाष भामरे 5288 मतांनी पुढे
- धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसला 99,994 मते तर भाजपाला एक लाख 5272 मते.
- तिसऱ्या फेऱ्या अखेर भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे 5288 मतांनी पुढे आले.
- काँग्रेसचा 7000 चा लीड तोडत भाजपने घेतली मुसंडी
-
Raver Lok Sabha Election Results: रावेरमध्ये 26 हजार 332 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर
- रावेर लोकसभा मतदारसंघात
- भाजपचा उमेदवार रक्षा खडसे एकूण पडलेले मते 99 हजार 555
- राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार श्रीराम पाटील 73 हजार 223 पिछाडीवर
- आतापर्यंत 26 हजार 332 मतांनी रक्षा खडसे आघाडीवर
-
Raver Lok Sabha Election Results: रक्षा खडसे : 19378 मतांनी आघाडीवर
रावेर लोकसभा
- महाविकास आघाडी उमेदवार श्रीराम पाटील = पहिली फेरीचे मत 15669+ दुसऱ्या फेरीचे 14156
- महायुती उमेदवार रक्षा खडसे= पहिल्या फेरीचे 24094 मत+ दुसऱ्या फेरीचे 25109
- पहिली आणि दुसरी फेरी रक्षा खडसे : 19378 मतांनी आघाडीवर
-
Nandurbar Lok Sabha Election Results: नंदुरबारमध्ये काँग्रेस आघाडीवर
नंदुरबार लोकसभा पहिली फेरी
- काँग्रेस :- गोवाल पाडवी :- 35 हजार 697
- भाजप :- डॉक्टर हिना गावित :- 16 हजार 301
- गोवाल पाडवी 19 हजार 396 मतांनी आघडीवर
- एकूण मतदान :- 55137
-
Dhule Lok Sabha Election Results: शोभा बच्छाव 7184 मतांनी पुढे
धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव 7 184 मतांनी पुढे आहे. डॉक्टर भामरे यांना मोठा झटका मानला जात आहे.
-
Nashik Lok Sabha Election Results: राजाभाऊ वाजे 36340 मतांनी आघाडीवर
नाशिक लोकसभा मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे 36340 मतांनी आघाडीवर गेले आहे.
-
Nashik Lok Sabha Election Results: राजाभाऊ वाजे 23500 मतांनी आघाडीवर
तिसऱ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे 23500 मतांनी आघाडीवर गेले आहेत. विद्यामान खासदार हेमंत गोडसे पिछाडीवर आहेत.
-
Dhule Lok Sabha Election Results: डॉक्टर सुभाष भामरे 72 मतांनी पुढे
लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे 72 मतांनी पुढे आहेत. धुळ्यात अत्यंत अटीतटीची लढत होत आहे.
-
Jalgaon Lok Sabha Election Results: जळगाव लोकसभा पहिली फेरी
जळगाव लोकसभा पहिली फेरी
- करण पवार – 14477
- स्मिता वाघ – 29702
स्मिता वाघ यांची 15,225 मतांनी आघाडी
-
Raver Lok Sabha Election Results: रावेरमध्ये रक्षा खडसे यांची आघाडी
रावेर लोकसभा मतदार संघातून भाजप उमेदवार रक्षा खडसे आठ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
-
Dindori Lok Sabha Election Results: भारती पवार 500 मतांनी आघाडीवर
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर भारती पवार 500 मतांनी आघाडीवर आहेत.
-
Nandurbar Lok Sabha Election Results: नंदुरबारमध्ये काँग्रेसची आघाडी
नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवल पाडवी यांनी पाहिल्या फेरीत १९ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
-
Dhule Lok Sabha Election Results: धुळे लोकसभा मतदारसंघात 30 मिनिट उशिराने मतमोजणीला सुरुवात
धुळे लोकसभा मतदारसंघात 30 मिनिट उशिराने मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणी उशिरा सुरू झाल्यामुळे पदाधिकारी व मतमोजणी प्रतिनिधी ताटकळले. पोस्टल बॅलेट व इतर मतमोजणीला सुरुवात झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली घोषणा
-
Nashik Lok Sabha Election Results: नाशिकमध्ये ईव्हीएम मतमोजली सुरुवात
ईव्हीएम मशिनवरील मतमोजणीला सुरवात झाली. पोस्टल मतमोजणीत राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली होती.
-
Jalgaon Lok Sabha Election Results: स्मिता वाघ जळगावातील राम मंदिरात
महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जळगावातील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
-
Nashik Lok Sabha Election Results: नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे आघाडीवर
नाशिकमध्ये टपाली मतदानाच्या मतमोजणीस सुरुवात झाली. त्यात महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे आघाडीवर आहे.
-
Dhule Lok Sabha Election Results: धुळ्यात स्ट्राँग रुमचे सील काढले
धुळे लोकसभा मतदारसंघाचे मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सील काढण्यात आले. आता आठ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे.
-
Raver Election Results 2024 Live Updates: रावेरमध्ये रक्षा खडसे की श्रीराम पाटील
रावेर लोकसभा मतदार संघात रक्षा खडसे यांचा विजय होणार की श्रीराम पाटील धक्का देणार, हे आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
-
Jalgaon Lok Sabha Election: कोण मारणार बाजी
जळगाव लोकसभा मतदार संघात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजता जळगाव लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.
Published On - Jun 04,2024 12:23 AM