कल्याण लोकसभा निकाल 2024 : शिंदेंचचं ‘कल्याण’, श्रीकांत शिंदे यांची विजयाची हॅटट्रिक
Kalyan Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत शिवसेना वि. शिवसेना अर्थात श्रीकांत शिंद वि. वैशाली दरेकर यांच्यात लढाई होती. अखेर कल्याणचे निकाल समोर आले असून मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि दोनवेळा खासदार राहिलेले श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदे यांनी पराभूत केलं आहे

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत शिवसेना वि. शिवसेना अर्थात श्रीकांत शिंद वि. वैशाली दरेकर यांच्यात लढाई होती. अखेर कल्याणचे निकाल समोर आले असून मुख्यमंत्री शिंदेंचे सुपुत्र आणि दोनवेळा खासदार राहिलेले श्रीकांत शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदे यांनी पराभूत केलं आहे.
या निवडणुकीत राज्यभरात महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत असली तरी कल्याणमध्ये खरी लढत ठाकरे गट वि. शिंदे गट अशीच होता.. महाविकास आघाडीमध्ये कल्याणची ही जागा ठाकरे गटाकडे आली आणि त्यांनी वैशाली दरेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. तर महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला मिळाली. दोघांसाठीही ही प्रतिष्ठेची लढाई बनली होती. अखेर श्रीकांत शिंदेनी विजयी पताका कायम राखली. २ लाखांपेक्षा अधिक मतांनी त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
शिंदे वि. ठाकरे सामना
कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ. त्यामुळे यावेळी पुन्हा श्रीकांत शिंदे यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ठाकरे वि शिंदे असा हा सामना असून दोघांसाठीही ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. आज मतमोजणीला सुरूवात झाल्यापासूनच आता ही जागा कोण जिंकतय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कल्याणचं दोनदा प्रतिनिधित्व करणारे श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा बाजी मारून पुन्हा संसदेत दिसतात की शिवसेनेच्या वैशाली दरेकर त्यांना धक्का देत बाजी पलटवतात याची सर्वांना उत्सुकता होती.
कल्याण लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला मुख्यमंत्र्यांचा गड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार प्रत्येक वेळी खासदार म्हणून निवडून येतो. मात्र आता शिवसेनेतच दोन गट झाले आहेत. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यासाठी दोन्ही उमेदवारांनी कसून प्रचार केला. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर उतरून जोरदार प्रचार केल्याचे दिसून आले.
कल्याण लोकसभा मतदार संघाचा इतिहास
कल्याण लोकसभा मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान झाले. कल्याण लोकसभा मतदारसंघात केवळ 50.12 टक्के मतदान झाले होते. कल्याणमध्ये 2014 साली 42.88 टक्के तर 2019 साली 44.21 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी बाळाराम पाटील यांचा 3,44,343 मतांनी पराभव केला. श्रीकांत शिंदे यांना 5,59,723 मते मिळाली होती.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली १० वर्ष कल्याण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असले तरीही या मतदारसंघातील अनेक प्रश्न अद्याप कायम आहेत. शीळफाटा येथे होणारी वाहतूक कोंडी हा एक कळीचा, महत्वाचा मुद्दा आहे. तसेच रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. दोनदा खासदार राहिलेले श्रीकांत शिंदे यांना ही निवडणूक कशी जाते, तिसऱ्यांदा ते बाजी मारून संसदेत जातात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर शिवसेना ठाकरे गटातर्फे वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच ही लढाई चुरशीची झाली आहे. ‘गद्दारांना एक महिला धडा शिकवेल’ हा ठाकरे गटाचा या निवडणुकीत प्रचार दरेकर यांनी सुरू ठेवला. कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदे, वैशाली दरेकर यांच्यासह 28 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स
