शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मोदी, शाह यांचा ग्रीन सिग्नल, कुणी केला दावा ?

राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच महायुतीतील शिंदे सरकारच्या एका नेत्यानेही दावा केला असून कॅबिनेटची विस्तार राज्यात करावाच लागेल असे म्हटले आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी दावा केला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, मोदी, शाह यांचा ग्रीन सिग्नल, कुणी केला दावा ?
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 3:25 PM

लोकसभा निवडणुकीत एनडीला बहुमत मिळालं असलं तरी भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपची बरीच पिछेहाट झाली आहे. दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केले जाणार आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. केंद्रातील सत्तास्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच महायुतीतील शिंदे सरकारच्या एका नेत्यानेही दावा केला असून कॅबिनेटची विस्तार राज्यात करावाच लागेल असे म्हटले आहे. शिंदे सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे.

कॅबिनेटचा विस्तार महाराष्ट्रात करावाच लागेल, एक लिमिट असते. तुम्ही पूर्ण कॅबिनेट बनवू शकले नाहीत हा शिक्का राहील, त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्री मंडळाचा हा विस्तार होईल. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल असेही शिरसाट म्हणाले. आज भाजपची अंतर्गत बैठक होणार आहे. या बैठकीत राज्याताली भाजपच्या पराभवाची कारणं शोधली जाणार असून मंत्रीमंडळविस्तारासंदर्भातही चर्चा होणार आहे, असे समजते. आगामी विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तार होणार आहे, असे वृत्त आहे.

यांसदर्भातच संजय शिरसाट यांनीही भाष्य करत लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनीही ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केला आहे.

सरकारला कोणताही धोका नाही

लोकसभा निवडणूकीत भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळाले असून आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही दलांच्या बैठकांचा जोर दिल्लीत सुरु झाला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी घाई सुरू झाली आहे. या मुद्यावरी संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. एनडीएचं सरकार स्थापन व्हायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. नितेश कुमार , चंद्राबाबू नायडू यांना सोबत घेऊन आपण सरकार बनवू असं काहींना वाटू लागलंय. पण सरकारला कोणताच धोका नाही, 26 पक्षांपेक्षा या चार पक्षाचं सरकार केव्हाही चांगलं. इंडीया सरकार बनवेल असं वाटतं नाही. १० तारखेच्या आत एनडीए सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितिश कुमार इंडिया आघाडीत जाणार नाहीत असे सांगत संजय राऊत लालूच देण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसला

लोकसभा निवडणुकीता राज्यात महायुतीला केवळ अवघ्या १७ जागा मिळाल्या, भाजपचीही पिछेहाट झाली. याची कारणमीमांसा करताना संजय शिरसाट यांनी आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसल्याचे स्पष्ट मत मांडले. सर्व्हे, जागा वाटपात दिरंगाई झालाी त्याचाही फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. ग्राऊंड लेव्हलला कार्यकर्त्याला महत्व देणं गरजेचे असून ज्या गोष्टी राहिल्या त्यांनी उणीव विधानसभेत भरून काढू असे शिरसाट यांनी सांगितले. सतराचा खतरा वाटत नाही, ताक फुंकून पिऊ, दुध गरम होतं आम्ही ताक समजून पीत होतो. पण मतदारांना गृहीत धरणं चुकीचं आहे, मतदार जागा दाखवतो, असं शिरसाट म्हणाले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.