मेरठ लोकसभा निकाल 2024 : अरुण गोविल 6 हजार मतांनी पिछाडीवर
Meerut Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : मेरठ लोकसभा मतदारसंघातून कोणाचा होणार विजय, मेरठ याठिकाणी 'राम आएंगे'? कोण जिंकणर बाजी?

मेरठ लोकसभा मतदारसंघातून (Meerut lok sabha election 2024 )कोण बाजी मारणार हे 4 जूनला निकाल जाहीर झाल्यानंतरच ठरेल. भाजपकडून अरुण गोविल, सपाकडून सुनीता वर्मा, बसपकडून देवव्रत कुमार त्यागी हे उमेदवार (Meerut lok sabha candidate) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रामायण मालिकेतील राम अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठमधून 6 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.
मेरठ लोकसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेश राज्यातील 80 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. मेरठचा सराफा व्यवसाय हा आशियातील नंबर 1 व्यापारी बाजार आहे. सध्या सर्वाचं लक्ष निकालाकडे लागलं आहे.
सांगायचं झालं तर, 2011 च्या आकडेवारीनुसार, मेरठची लोकसंख्या सुमारे 35 लाख आहे, त्यापैकी 65 टक्के हिंदू आणि 36 टक्के जनता मुस्लिम आहेत. मेरठमधील एकूण मतदारांची संख्या 1964388 आहे, त्यापैकी 55.09 टक्के पुरुष आणि 44.91 टक्के महिला मतदार आहेत. याठिकाणी 2014 मध्ये येथील मतदानाची टक्केवारी 63.12 टक्के होती.
2019 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2019)
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे राजेंद्र अग्रवाल यांनी बाजी मारली होती. त्यांना 5,86,184 मते मिळाली होती. बसपाचे हाजी याकूब कुरेशी 5,81,455 मतांनी दुसऱ्या स्थानावर होते. तर काँग्रेसचे हरेंद्र अग्रवाल 34,479 मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.
2014 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2019)
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात जोरदार मुसंडी मारली होती. याची सुरुवात मेरठपासूनच झाली. मेरठमध्ये भारतीय जनता पक्षाला सुमारे 48 टक्के मतं मिळाली होती. राजेंद्र अग्रवाल यांनी भाजपकडून निवडणुक लढवली होती. तेव्हा त्यांच्या विरोधात बॉलिवूड अभिनेत्री नगमा निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
राजेंद्र यांनी 5,32,981 इतकी मतं मिळाली होती. तर नगमा काँग्रेसकडून उभ्या होत्या. त्यांना 42,911 मतं मिळाली होती. आता मेरठमध्ये कोणाचं राज्य येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :
लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स