उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निकाल 2024 : काँटे की टक्कर, रवींद्र वायकर पुन्हा पिछाडीवर

Mumbai north west Election Result 2024 News in Marathi : उत्तर पश्चिम मुंबईत सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर निवडणूक मैदानात आहेत. आज बाजी कोण मारणार? याची उत्सुक्ता आहे.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निकाल 2024 : काँटे की टक्कर, रवींद्र वायकर पुन्हा पिछाडीवर
amol kirtikar vs ravindra waikar
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 1:24 PM

मुंबई उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य मुंबईच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष आहे. मुंबईत उत्तर पश्चिममध्ये सुद्धा सेना विरुद्ध सेना असाच सामना आहे. उत्तर पश्चि मुंबईतून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात आहेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचं आव्हान आहे. दोन्ही उमेदवार नवीन असून पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. सध्या उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांचे वडील गजनान किर्तीकर खासदार आहेत. पण गजानान किर्तीकर शिवसेना शिंदे गटात आहेत. अमोल किर्तीकर ठाकरे गटासोबतच राहीले. त्यांना ठाकरेंनी तिकीट दिलं. रवींद्र वायकर मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर ते आमदार झाले. त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्या तुलनेत अमोल किर्तीकर नवीन आहेत.

उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर 4 हजार 755 मतांनी आघाडीवर, रवींद्र वायकर पिछाडीवर.

रवींद्र वायकर आणि अमोल किर्तीकर या दोघांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला होता. रवींद्र वायकर यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या काही दिवस आधी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. अमोल किर्तीकर यांच्यावर कोविड काळात खिचडी घोटाळ्याचे आरोप झालेत. दोघेही ईडीच्या रडारवर आहेत. त्यामुळे उत्तर पश्चिम मुंबईचा हा मतदारसंघ सुरुवातीपासून चर्चेत आहे. या मतदारसंघात 54.84 टक्के मतदान झालय. 9 लाख 51 हजार 580 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

उमेदवाराचे नाव आघाडी-पिछाडीनिकाल
अमोल किर्तीकर (ठाकरे गट)आघाडी
रवींद्र वायकर (शिवसेना शिंद गट)पिछाडी

रवींद्र वायकर यांची विजयासाठी सर्व मदार भाजपावर

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्वमधून रविंद्र वायकर शिवसेना (शिंदे गट), दिंडोशी सुनील प्रभू (ठाकरे गट), गोरेगाव विद्या ठाकूर (भाजप), वर्सोवा भारती लव्हेकर (भाजप), अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप), अंधेरी पूर्व ऋतुजा लटके (ठाकरे गट) आमदार आहेत. तीन भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे रवींद्र वायकर यांची विजयासाठी सर्व मदार भाजपावर आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.