Pune Election Final Result 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ विजय, वसंत मोरे तिसऱ्या क्रमांकावर

Pune Lok Sabha Election Final Result 2024: पुणे लोकसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत होती. भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीपूर्वी मनसेत असणारे वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत वंचितकडून निवडणूक लढवली होती.

Pune Election Final Result 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ विजय, वसंत मोरे तिसऱ्या क्रमांकावर
मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 4:03 PM

पुणे लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु काँग्रेस आणि भाजपच्या या लढतीत वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे टिकले नाही. त्यांना २५ हजार मतेही मिळाली नाही. भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास ८८ हजार मतांनी विजय मिळवला. कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जादू करणारे रवींद्र धंगेकर यांची जादू लोकसभेत चालली नाही.

पोस्टल मतांची मतमोजणी

आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. पुणे लोकसभा मतदार संघातील ४ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर पुन्हा भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर आले. मुरलीधर मोहोळ यांना दहा वाजता 57303 तर  रवींद्र धंगेकर यांना 44674 हजार मते होती.

अशी होती लढत

पुणे लोकसभा मतदार संघात यंदा तिरंगी लढत होती. भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol BJP Candidate) यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Congress Candidate) निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीपूर्वी मनसेत असणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारी होते. परंतु त्यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली.

पुणे लोकसभा मतदार संघासाठी 13 मे रोजी मतदान झाले होते. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सुमारे 20 लाख 61 हजार 276 मतदार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात केवळ 51.25 टक्के मतदान झाले होते.

पुणे लोकसभा मतदार संघाचा इतिहास (Pune Lok Sabha Seat Winner History)

पुणे लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 49.82 टक्के मतदान झाले होते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय मिळविला होता. 2014 मध्ये मोदी लाटेत अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना पराभूत केले होते. अनिल शिरोळे यांनी 3,15,769 मतांनी निवडणूक जिंकली. त्यांना 5,69,825 मते तर डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना 2,54,056 मते मिळाली.

साल 2019 मध्ये गिरीश बापट यांना 6,32,835 मते मिळून ते जिंकले. गिरीश बापट यांनी 3,24,628 मतांनी आघाडी घेतली. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या मोहन जोशी यांना 3,08,207 मते मिळाली. 29 मार्च 2023 रोजी गिरीश बापट यांचे निधन झाले होते. त्यानंतर पुणे लोकसभेत पोटनिवडणूक झाली नव्हती.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.