South Mumbai lok sabha Election Final Result 2024 : दक्षिण मुंबईत ठाकरे गटाची बाजी, शिंदे गटाला चारली धूळ
South Mumbai Election Result 2024 News in Marathi : दक्षिण मुंबईत यंदा सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव रिंगणात आहेत, दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाकडून अरविंद सावंत निवडणूक मैदानात आहेत. सलग दोन टर्मपासून अरविंद सावंत इथून खासदार आहेत. आज बाजी कोण मारणार? याची उत्सुक्ता आहे.
आज लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत आहेत. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. यात दक्षिण मुंबईच्या निकाल काय लागतो? याची उत्सुक्ता आहे. वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा हे सहा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईत येतात. यात वरळी, शिवडीमध्य ठाकरे गटाचे आमदार आहेत. भायखळ्यात स्वत: यामिनी जाधव आमदार आहेत. मलबार हिलमध्ये भाजपाचे मंगलप्रभात लोढा, कुलाब्यात भाजपाचे राहुल नार्वेकर आमदार आहेत. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत. दक्षिण मुंबईत यंदा 50.06% मतदान झालं.
दक्षिण मुंबईत आणि ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी बाजी मारली आहे. त्यांच्याकडे 54 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी होती. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला.
मागच्या काही वर्षातील लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक वेगळी आहे. दक्षिण मुंबई हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. मागच्या दोन टर्मपासून इथे ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. पण दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर सगळी समीकरण बदलली. आता इथे सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गट महायुतीमध्ये आहे. यामिनी जाधव या दक्षिण मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांचं आव्हान आहे.
उमेदवाराचे नाव | आघाडी-पिछाडी | निकाल |
---|---|---|
अरविंद सावंत (ठाकरे गट) | - | विजयी |
यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) | - | पराभूत |
अरविंद सावंत कितीवेळा खासदार?
अरविंद सावंत हे 2014 मध्ये मोदी लाटेत लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा त्यांनी निवडणूक जिंकली. केंद्रात ते अवजड उद्योग खात्यात मंत्री होते. पण 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालिन शिवसेनेने महाविकास आघाडीत सामील व्हायचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. अरविंद सावंत यांच्यासाठी एक चांगली बाब म्हणजे त्यांच्यासमोरच्या उमेदवार तुलनेने तितक्या ताकदवर नाहीयत. मतदारसंघात त्यांचं नाव आणि चेहरा परिचयाचा नाहीय. पण म्हणून अरविंद सावंत यांच्यासाठी ही लढाई सोपी नाहीय. कारण भाजपाची सुद्धा या मतदारसंघात ताकद आहे. यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये भायखळ्यातून 25 हजारच्या फरकाने विधानसभेची निवडणूक जिंकली होती.