Assembly Election 2023 | ‘जाऊन कपडे फाडा’, निवडणुकीआधी काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये जुंपली

Assembly Election 2023 | विधानसभा निवडणुकीआधी पक्षात अशी हालत असेल, तर ते काँग्रेस पक्षासाठी चांगले संकेत नाहीयत. काँग्रेसचे दोन मोठे नेते जाहीरपणे अशी वक्तव्य करतायत. त्याचा पक्षाच्या निवडणूक प्रचारावर परिणाम होऊ शकतो.

Assembly Election 2023 | 'जाऊन कपडे फाडा', निवडणुकीआधी काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये जुंपली
madhya pradesh assembly election 2023 kamalnath vs digvijay singh
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 3:02 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीच वार वाहतय. त्यामुळे इथे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यामध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी एका व्हिडिओमध्ये दिग्विजय सिंह यांचे कपडे फाडण्याबद्दल वक्तव्य केलय. दिग्विज. सिंह यांनी लगेच कमलनाथ यांच्या वक्तव्यावर पलटवार केला. मध्य प्रदेशच्या 230 विधानसभा जागांवर 17 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. 3 डिसेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. त्याआधी कमलाथ आणि दिग्विजय सिंह या दोन काँग्रेस नेत्यांमध्ये शाब्दीक लढाई सुरु आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान दोन मोठ्या नेत्यांमधील भांडण हे काँग्रेससासाठी चांगले संकेत नाहीयत.

या भांडणावरुन भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधलाय. भाजपाने काँग्रेसला गटबाजीमध्ये विखुरलेला पक्ष म्हटलय. हे सर्व प्रकरण काय आहे? जाणून घ्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ एका भाषणात म्हणाले की, दिग्विजय सिंह यांनी तुमच म्हणण ऐकल नाही, तर त्यांचे कपडे फाडून टाका. त्यावर दिग्विजय सिंह म्हणाले की, साइन पीसीसी चीफची असते, मग कपडे कोणाचे फाटले पाहिजेत?. दोघे गमतीरशीर अंदाजात परस्पराबद्दल हे बोलले. दिग्विजय सिंह म्हणाला की, शंकराच काम विष पिण आहे, तर ते पिणार. ‘आधीपासून विष पितायत, पुढेही प्याव लागेल’

त्यावर कमलनाथ म्हणाले की, “दिग्विजय सिंह स्वत:च म्हणालेत की, ते आधीपासून विष पितायत. पुढेही प्याव लागेल” वाद वाढल्यानंतर दिग्विजय सिंह म्हणाले की, “कुटुंब मोठं असत, तेव्हा सामूहिक सुख आणि सामूहिक लढाई होते. मोठ्यांनी समजुतीने मार्ग काढला पाहिजे. मन आणि मेहनतीने काम करतात ईश्वर त्यांनाच साथ देतो” या वादावर शिवराज सिंह सरकारमधील मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, “काँग्रेस गटा-तटात विखुरलेला पक्ष आहे. ही सगळी लढाई कमलनाथ यांचा मुलगा आणि दिग्विजय सिंह यांच्या मुलावरुन आहे. दिग्विजय सिंह मित्र आहेत, हे कमलनाथ यांना समजलं पाहिजे”

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.