Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिथुन चक्रवर्तींना मोदींना भेटायचंय, भाजप नेत्याला फोनवरून साकडे; बंगालच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी?

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mithun Chakraborty to star in PM narendra modi show?)

मिथुन चक्रवर्तींना मोदींना भेटायचंय, भाजप नेत्याला फोनवरून साकडे; बंगालच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी?
Mithun Chakraborty
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 4:26 PM

कोलकाता: पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटल्यानंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याशी मिथुन यांनी फोनवरून ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेनी जोर धरला आहे. (Mithun Chakraborty to star in PM narendra modi show?)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार 7 मार्च रोजी पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत. कोलकाताच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर उद्या मोदींची पहिली निवडणूक रॅली होणार आहे. या रॅलीला यशस्वी करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. रॅलीच्या निमित्ताने सुरक्षेचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निमित्ताने उद्या मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांना मिथुन यांच्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

माझी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी फोनवरून चर्चा झाली आहे. ते कोलकात्याला येऊन चर्चा करणार आहेत. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं सांगतानाच उद्या मोदींच्या रॅलीमध्ये कुणी पक्षात प्रवेश करणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. मग ते मिथुनदा का असेना, असं विजयवर्गीय यांनी सांगितलं. मिथुन चक्रवर्ती यांनी मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याने उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिथुन चक्रवर्ती हे टीएमसीचे राज्यसभेचे सदस्यही होते.

आज काय घडलं?

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. सकाळपासूनच त्रिवेदी यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्याने टीएमसीच्या तंबूत प्रचंड खळबळ उडाली होती. त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन एकट्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्रिवेदी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘त्या’ नाराजांचं काय?

दरम्यान, भाजपला पराभूत करत बंगालचा गड कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जी यांन कसरत सुरू केलेली असताना तिकीट न मिळाल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे या नाराजांनी आता थेट भाजप नेते मुकुल रॉय यांची भेट घेऊन भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या 76 नाराजांमध्ये माजी आमदारही आहेत. तसेच ज्या 28 आमदारांचे तिकीट कापण्यात आले ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या शिवाय विद्यमान आमदार दिनेश बजाज आणि गीता बख्शी हे सुद्धा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. (Mithun Chakraborty to star in PM narendra modi show?)

संबंधित बातम्या:

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता

बंगालमध्ये M फॅक्टरचीच लढाई; भाजपच्या ‘जय श्रीराम’च्या नाऱ्याविरोधात दीदीचे स्पेशल ’42 M’ वाचा स्पेशल रिपोर्ट

कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा
ही गुंड प्रवृत्ती..कामराच्या शोच्या सेटची तोडफोड अन् दमानियांचा निशाणा.
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट
युनीकॉन्टीनेन्टल हॉटेल तोडफोड;शिवसैनिकांना पोलीस ठाण्यात VIP ट्रीटमेंट.
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका.