PM Narendra Modi : काही लोकांसाठी गाय ‘गुन्हा’ असेल, आमच्यासाठी ती माता आहे – पंतप्रधान मोदी
'आमच्याकडे काही लोकांनी गो धनाची बाब गुन्ह्याच्या रुपात आणून ठेवली आहे. गाय काही लोकांसाठी गुन्हा असू शकते, आमच्यासाठी गाय माता आहे. गायीच्या मुद्द्याची मजा घेणारे लोक हे विसरले की याच पशुधनामुळे देशातील 8 कोटी जनतेचं कुटुंब चालतं. भारत प्रत्येक वर्षात साडे आठ लाख कोटी रुपयांचं दुधाचं उत्पन्न घेतो'.
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी वाराणसीच्या (Varanasi) करखियांवमध्ये 870 रुपयांपेक्षा अधिक गुंतवणीच्या 22 विकास योजनांचं लोकार्पण केलं. तसंच 1 हजार 225 कोयी रुपयांच्या पाच योजनांचं भूमिपूजनही केलं. यावेळी पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, वाराणसीतील शेतकरी आणि पशूपालकांसाठी आजचा दिवस मोठा आहे. मोदी यांनी 2 हजार 100 कोटीच्या 27 योजना वाराणसीकरांसाठी समर्पित केल्या.
मोदी म्हणाले की, आमच्याकडे काही लोकांनी गो धनाची बाब गुन्ह्याच्या रुपात आणून ठेवली आहे. गाय काही लोकांसाठी गुन्हा असू शकते, आमच्यासाठी गाय माता आहे. गायीच्या मुद्द्याची मजा घेणारे लोक हे विसरले की याच पशुधनामुळे देशातील 8 कोटी जनतेचं कुटुंब चालतं. भारत प्रत्येक वर्षात साडे आठ लाख कोटी रुपयांचं दुधाचं उत्पन्न घेतो.
तीसरा ये कि पशुपालन, महिलाओं के आर्थिक उत्थान, उनकी उद्यमशीलता को आगे बढ़ाने का बहुत बड़ा जरिया है।
और चौथा ये कि जो हमारा पशुधन है, वो बायोगैस, जैविक खेती, प्राकृतिक खेती का भी बहुत बड़ा आधार है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 23, 2021
पूर्वांचलमधील शेतकरी आणि पशुपालकांना फायदा होणार
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की बनास डेअरी संयत्रामुळे पूर्वांचलमधील जवळपास 6 जिल्ह्यातील लोकांना फक्त नोकरी मिळणार नाही, तर शेतकरी आणि पशुपालकांना मोठा फायदा होणार आहे. आज उत्तर प्रदेशातील लाखो लोकांना त्यांच्या घराची कागदपत्रंही देण्यात आली. यावेळी दीड हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या योजनांचं लोकार्पण आणि शिलान्यासही करण्यात आला. या योजनांमुळे वाराणसीचं चित्र बदलण्यात मदत होईल.
6-7 वर्ष पहले की तुलना में देश में दूध उत्पादन लगभग 45 प्रतिशत बढ़ा है।
आज भारत दुनिया का लगभग 22 प्रतिशत दूध उत्पादन करता है।
मुझे खुशी है कि यूपी आज देश का सबसे अधिक दूध उत्पादक राज्य तो है ही, डेयरी सेक्टर के विस्तार में भी बहुत आगे है: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 23, 2021
‘एकेकाळी दारासमोर दुभती जनावरं हे संपन्नतेचं लक्षण होतं’
एक काळ असता होता की दारासमोर दुभती जनावरं हे संपन्नतेचं लक्षण होतं. आमच्या शास्त्रांमध्ये सांगितलं गेलं आहे की आमच्या सर्वत्र गाय आहे आणि आम्ही गायींच्या सानिध्यात राहू. आमच्या डेअरी सेक्टरसाठी कामधेनू आयोगाचं गठन केलं. तसंच शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डशी जोडलं. चारा आणि गोठ्यासाठीही सरकारनं देशव्यापी योजना हाती घेतली. जनावरांवरील रोगाच्या इलाजासाठी सरकारने मोफत लसीकरण मोहीम राबवली, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
हमारे यहां गाय की बात करना, गोबरधन की बात करना कुछ लोगों ने गुनाह बना दिया है।
गाय कुछ लोगों के लिए गुनाह हो सकती है, हमारे लिए गाय, माता है, पूजनीय है।
गाय-भैंस का मजाक उड़ाने वाले लोग ये भूल जाते हैं कि देश के 8 करोड़ परिवारों की आजीविका ऐसे ही पशुधन से चलती है: PM
— PMO India (@PMOIndia) December 23, 2021
इतर बातम्या :