पंजाबमध्ये काँग्रेसला सोडणाऱ्या ‘कॅप्टन’चाच पराभव; नेते कॉंग्रेसला आजच सोडून जातात असं नाही, पण सोडून गेलेले, नवा पक्ष काढलेल्या नेत्यांचे पुढे झाले काय..?

कॅप्टन सिंग यांनीच फक्त काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे असे नाही तर काँग्रेस अनेक वेळा फुटली होती. तर देशातील अनेक तगड्या आणि दिग्गज नेत्यांनी काँग्रेस सोडून आपला नवा पक्ष काढून स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडला. तर काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता...

पंजाबमध्ये काँग्रेसला सोडणाऱ्या 'कॅप्टन'चाच पराभव; नेते कॉंग्रेसला आजच सोडून जातात असं नाही, पण सोडून गेलेले, नवा पक्ष काढलेल्या नेत्यांचे पुढे झाले काय..?
Capt.Amarinder SinghImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 6:29 PM

मुंबईः निवडणूक झाली आणि पदरी अपयश आले की, काँग्रेसचे अनेक नेते पक्षांतर तर करतात आणि नाहीतर स्वतःचा पक्ष काढतात. पाच राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला पराभव मिळाल्यानंतर आता काँग्रेसचे नेते पर्याय शोधू लागले आहे. काँग्रेसपासून फारकत घेऊन नवा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder singh) यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. पंजाबच्या (Panjab) पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे अजित पाल सिंग कोहली (Ajit Pal Singh Kohli) यांनी  त्यांचा पराभव केला आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस सोडल्यानंतर अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नव्या पक्षाची घोषणा करून पंजाब लोक काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला. पक्ष काढल्यानंतर त्यांनी भाजपसोबत युती करुन ही निवडणूक एकत्र लढवली. ही निवडणूक त्यांनी भाजसोबत जाऊन लढवली असली तरी त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. म्हणूनच कॅप्टनच्या राजकारणाला ब्रेक मिळाले असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही पण पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्ष हा एक नंबरचा ठरला आहे.

कॅप्टन यांचे राजकीय भवितव्य काय?

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती. स्वतंत्र पक्ष काढून त्यांना पंजाबमध्ये आपले अस्तित्व दाखवायचे होते. आणि पंजाबच्या राजकारणात आपण किती महत्वाचे आहोत हेही सिद्ध करायचे होते. हे करत असताना त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेतून त्यांना हेच सिद्ध करायचे होते की, आपल्याला डावललेले गेले आहे म्हणजे काँग्रेसने नेमके काय गमावले आहे. पंजाबच्या राजकारणात काँग्रेस पक्ष बाहेर गेला असला तरी कॅप्टनना मात्र आपली स्वतःचीच जागा वाचवता आली नाही.

संघर्षात वय आड येणार

कॅप्टन सिंग यांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे आणि त्यांना आपले राजकीय भविष्यही एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे आहे मात्र आता त्यांच्या अस्तित्वारच प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. ते म्हणतात की राजकारणात संघर्ष हा माझ्यासाठी नवा नाही पण आता या संघर्षात त्यांना त्यांचे वय आड येणार आहे.

मी पुन्हा लढणार नाही

राजकीय मतभेदाबद्दल 2017 मध्ये 80 वर्षाच्या कॅप्टन सिंग जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी जाहीर केले होते की, मी पुन्हा निवडणूक लढविणार नाही. पण त्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलून, काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी स्वतःच्याच राजकीय पक्षाची स्थापना केली.

कॅप्टनसारखे नेते काँग्रेसला नवे नाहीत, त्यांमुळे पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे काँग्रेस पक्षात नाराज होऊन नवा पक्ष स्थापन करणारे कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिले नेते नाहीत. कॅप्टन सिंग यांच्या आधीही अनेक नेत्यांना काँग्रेस सोडून आपला वेगळा मार्ग निवडला होता, मात्र त्यामध्ये त्यांना किती यश मिळाले हा संशोधनाचा विषय ठरेल.

काँग्रेस एकदा नाही अनेकदा फुटली…

देशातील सगळ्यात जुना पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते, तरीही हा जुना पक्ष 64 पेक्षा अधिक वेळा फुटला आहे. आणि फुटलेल्या काँग्रेस पक्षाने 16 वेळा त्यात यशस्वी झाला आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही काँग्रेस पक्षाला फोडले होते, त्यामध्ये त्यांना दोन वेळा यशही आले होते. सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा असताना अनेकांनी नाराज होऊन काँग्रेस फोडली होती.

देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला जाणारा आणि स्वातंत्र्यापूर्व काळात 1923 मध्ये काँग्रेसमध्ये चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरु यांनी काँग्रेसची फारकत घेऊन स्वराज पक्षाची स्थापना केली होती.

सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधी यांच्यावर नाराज होऊन ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली होती. तर 1959 मध्ये काँग्रेसमधून काही नेत्यांनी फारकत घेऊन किसान मजदूर प्रजा पार्टी, हैदराबाद स्टेट प्रजा पार्टी आणि स्वराज खेडूत संघाची स्थापना केली.

काँग्रेस पक्षासाठी सर्वात वाईट काळ होता तो 1956 ते 1970 हा काळ. या काळात काँग्रेसपासून फारकत घेऊन काही नेत्यांनी 12 नवीन पक्षांची स्थापना केली.

काँग्रेसचे नेते चौधरी चरणसिंग यांनीही 1967 मध्ये फारकत घेऊन भारतीय क्रांती दलाची स्थापना केली, त्यानंतर त्याला लोकदल म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 1969 मध्ये जेव्हा सिंडिकेट पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली तेव्हा इंदिरा गांधीनीही काँग्रेस आर या नव्या पक्षाची स्थापना केली.

सिंडिकेटच्या नेत्यांनी काँग्रेसचे नाव बदलून इंडियन नॅशनल काँग्रेस (ओ) केले, त्यानंतर इंदिरा गांधीं ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडल्या त्यावेळी त्यांनी काँग्रेस (आय) या नव्या पक्षाची स्थापना केली.

त्याच वेळी, 1969 मध्ये बिजू पटनायक यांनी उत्कल काँग्रेसची स्थापना केली आणि आंध्र प्रदेशात एम चेन्नारेड्डी यांनी तेलंगणा प्रजा समिती स्थापना केली.

2009 मध्ये जगनमोहन रेड्डी यांनी त्यांचे वडील वायएस राजशेखर रेड्डी यांच्या नावावर वायएसआर काँग्रेसची स्थापना केली करुन नव्या पक्षाची घोषणा केली. तर

2016 मध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फुटला, त्यावेळी कारण होते छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, आणि त्यांना छत्तीसगड जनता काँग्रेसची स्थापना केली.

जे वेगळे पक्ष स्थापन झाले त्यांचे काय झाले?

स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेले अनेक पक्ष नाहीसे झाले, तर काही आजही अस्तित्वात आहेत. सुभाषचंद्र बोस आणि शार्दुल सिंग यांनी महात्मा गांधींशी मतभेद झाल्यामुळे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. पश्चिम बंगालमध्ये हा पक्ष अजूनही अस्तित्वात असला तरी त्याचा दबदबा आता कमी झाला आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी 1951 मध्ये तीन नवीन पक्ष काढले. यामध्ये जीवतराम कृपलानी यांनी किसान मजदूर प्रजा पार्टी, तंगुतुरी प्रकाशम आणि एनजी रंगा यांनी हैदराबाद स्टेट प्रजा पार्टी सुरू केली आणि नरसिंह भाई यांनी सौराष्ट्र खेडूत संघ नावाचा वेगळा पक्ष काढून आपली नवी चूल मांडली. यामध्ये हैदराबाद स्टेट प्रजा पार्टी किसान मजदूर प्रजा पक्षात विलीन करण्यात आले. पुढे किसान मजदूर प्रजा पार्टी प्रजा सोशालिस्ट पक्षामध्ये विलीन झाली आणि सौराष्ट्र खेडूर संघ स्वतंत्र पक्षात विलीन झाला.

1969 मध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी इंदिरा गांधींना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. म्हणून इंदिरा गांधी यांनी वेगळ्या काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 1998 मध्ये ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेस पक्ष सोडून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीही बनल्या. तर त्याच्या एका वर्षानंतर शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवार आजही त्याचे प्रमुख आहेत. तर शेवटच्या वेळी 2016 मध्ये छत्तीसगडमधील काँग्रेसचे मोठे नेते अजित जोगी यांनी पक्ष सोडला आणि छत्तीसगड जनता काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला.

गेल्या सात वर्षात 222 नेत्यांची सोडचिठ्ठी

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADAR) च्या सर्वेक्षणानुसार, 2014 ते 2021 या एकूण सात वर्षांत 222 नेते काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये गेले. त्यापैकी 177 खासदार आणि आमदार आहेत. 115 उमेदवारही काँग्रेसमध्ये दाखल झाले असून त्यांचे 61 खासदार आणि आमदार आहेत.

काँग्रेसपासून फारकत घेणाऱ्यांपैकी किती यशस्वी झाले?

ज्या नेत्यांनी काँग्रेस सोडली ते सगळेच यशस्वी झाले असे नाही, पण काही नेत्यांनी आपला पक्ष दुसऱ्या पक्षात विलीनही केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी राजगोपालाचारी यांनी 1956 मध्ये त्यांनी पक्ष सोडला, पक्ष सोडल्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय लोकशाही काँग्रेस पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मद्रासपुरता मर्यादित राहिला. तथापि, नंतर राजगोपालाचारी यांनी एन.सी. रंगासह 1959 मध्ये स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आणि त्यात भारतीय राष्ट्रीय लोकशाही पक्षाचे विलीनीकरण केले.

1964 मध्ये केएम जॉर्ज यांनी केरळ काँग्रेस हा नवा पक्ष काढला. मात्र, नंतर या पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी स्वत:चे सात वेगळे पक्ष काढले.

इंदिराजी यांच्याशी झालेल्या वादामुळे के. कामराज आणि मोरारजी देसाई यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संघटना नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला पण पुढे जाऊन त्यांनी जनता पक्षात विलीनीकरण केले.

1969 मध्ये बिजू पटनायक यांनी ओरिसामध्ये उत्कल काँग्रेसची स्थापना केली आणि मेरी चेना रेड्डी यांनी आंध्र प्रदेशात तेलंगणा प्रजा समितीची स्थापना केली.

काँग्रेस सोडलेले नेते मात्र अपयशी ठरले

कधी वैयक्तिक तर कधी राष्ट्रीय महत्वाकांक्षा यामुळे तगड्या आणि दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून पर्यायी मार्ग निवडला. यामध्ये प्रामुख्याने प्रणव मुखर्जी, जगजीवन राम, जी.के मूपनार, नारायण दत्त तिवारी, अर्जुन सिंह, माधव राव सिंधिया, नारायण दत्त तिवारी, पी चिदंबरम, तारिक अन्वर ही काही प्रमुख नावे आहेत, ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडला पण त्यांना तितकेच यश मिळाले नाही, पण ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले.

काँग्रेस सोडून यश मिळवलेले नेते

पण काही नेत्यांनी वेगळा पक्ष काढून मोठी जोखीम घेतली होती, त्यातील काही नेत्यांनी राजकीय आव्हाने पेलत आपले अस्तित्वात निर्माण केले. त्यामध्ये ममता बॅनर्जी, शरद पवार, जगन मोहन रेड्डी यांसारख्या नेत्यांनी स्वतःचा प्रादेशिक पक्ष निर्माण करून राजकीय झेंडा तर उंचावलाच, पण यशाची नवी गाथाही लिहिली.

ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी 1998 मध्ये काँग्रेससोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले त्यामुळे जवळपास 25 वर्षे काम केलेल्या पक्षाबरोबर त्यांनी फारकत घेतली आणि तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर पश्चिम बंगालमधील हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष ठरला. त्यानंतर त्यांच्या अविरत संघर्षानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 2011 मध्ये बंगालमध्ये सत्ता मिळाली. 2011 मध्ये त्यांनी पश्चिम बंगालमध्ये 34 वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीच्या सत्तेला बाजूला केले. त्यानंतर 5 मे 2021 रोजी त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे आजही बंगालमध्ये काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी लढताना दिसत आहे.

शरद पवार

शरद पवार यांनी 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. पवार, पीए संगमा, तारिक अन्वर यांसारख्या बड्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना पंतप्रधान होण्यास विरोध केला. त्यानंतर या मुद्यावरुन त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यावेळी तिघांनी मिळून ५ मे १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष काढला असला तरी त्यांच्या तरी राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेमुळे ते काँग्रेससोबत चालत आले आहेत.

जगन मोहन रेड्डी

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वत:चा प्रादेशिक पक्ष वायएसआर काँग्रेस स्थापन केला. त्यांचे वडील आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे सप्टेंबर 2009 मध्ये विमान अपघातात निधन झाले होते. त्यानंतर जगन यांनी आपण स्वतः मुख्यमंत्री असल्याचा त्यांनी दावा केला त्यामुळे काँग्रेस त्यांच्या विरोधात गेली.

संबंधित बातम्या

Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ, सर्वांचीच धाकधूक वाढली

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

Election Result 2022 Live: पंजाबमधील बंपर विजयाने ‘आप’ला लॉटरी, राज्यसभेवर 7 सदस्य निवडून जाणार; वाचा गणित काय?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.