Punjab Assembly Elections 2022: कोण आहेत आपचे अजित कोहली ज्यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा पराभव केला?

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकहाती गड जिंकलाय. आम आदमी पार्टीची घौडदौड पहिल्या कलांमधून पंजाब काबीज करताना दिसत आहे. काँग्रेसला मात्र पंजाबमध्ये मोठा झटका बसलाय. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचे पंजाबमध्ये पानिपत झाल्याचे दिसू येत आहे.

Punjab Assembly Elections 2022: कोण आहेत आपचे अजित कोहली ज्यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा पराभव केला?
अमरिंदर सिंह यांना मोठा झटकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 4:24 PM

पंजाब : आज पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती आलेत. त्यात पाच पैकी चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. पंजाबमधील निकाल (Punjab Assembly Election 2022) मात्र देशाला हादरवून सोडणारा आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकहाती गड जिंकलाय. आम आदमी पार्टीची घौडदौड पहिल्या कलांमधून पंजाब काबीज करताना दिसत आहे. काँग्रेसला मात्र पंजाबमध्ये मोठा झटका बसलाय. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचे पंजाबमध्ये पानिपत झाल्याचे दिसू येत आहे. पंजाब विधानसभेतील पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघाचे निकाल तर काँग्रेसला जोर का झटाक देणारे आहेत. कारण याठिकाणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrindar singh) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कॅप्टन यांचा आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली (Ajit Pal singh Kohli) यांच्याकडून पराभव झाला आहे. कॅप्टनचा पराभव धक्कादायक आहे, कारण गेल्या चार वेळा (2002, 2007, 2012 आणि 2017) ते या जागेवर सातत्याने विजय मिळवत आहेत.

कुणाला किती मतं मिळाली?

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार कॅप्टन अमरिंदर यांना 26,795 मते मिळाली, तर आपचे अजितपाल सिंह कोहलीला 43,720 मते मिळाली. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागा आहेत. त्यापैकी पटियाला अर्बन विधानसभा ही हॉट सीट आहे. निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून ही जागा चर्चेत आहे. 2017 मध्ये अमरिंदर सिंग यांनी पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता, मात्र त्यावर जनता जनार्दन यांनी आपचे उमेदवार अजितपाल सिंह कोहली विजयी केले आहेत. त्यामुळे हा निकाल धक्कादायक मानला जात आहेत.

अमरिंदर सिंह यांना झटका

अजित कोहली यांची राजकीय कारकिर्द

राजकीय पार्श्वभूमीतून आलेले अजित कोहली शिरोमणी अकाली दलाचे नगरसेवक झाल्यानंतर 2011 मध्ये महापौर झाले. अजितचे कुटुंब पंजाबमध्ये टकसाली अकाली दल म्हणून ओळखले जाते. त्यांचे वडील सुरजितसिंग कोहली हे अकाली दलाकडून विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. बादल सरकारच्या काळातही अजित पाल महापौर होते. मात्र स्थानिक लेव्हलच्या नेत्याने देश पातळीवरील मोठ्या नेत्याला चितपट केल्यामुळे कोहली यांचं चांगलेच कौतुक होतंय.

सिद्धू यांचं ट्विट

निकालानंतर सिद्धू यांच्याकडून आपचे अभिनंदन

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मुसंडी मारली. त्यानंतर काँग्रसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात की, आम आदमी पक्षाचा विजय हा, लोकांचा आवाज आहे. आपचे अभिनंदन करत पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारा, असे आवाहनही त्यांनी या ट्वीटमधून केले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार होते. येथे चरणजित सिंग चन्नी हे मुख्यमंत्री होते. सध्या निवडणुकीत काँग्रेसने 117 पैकी 71 जागा लढवल्या होत्या. मात्र, या ठिकाणी आता सर्वच्या सर्व जागा लढणाऱ्या आपची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. सध्याच्या कौलानुसार जवळपास 91 जागा आपच्या खात्यात जाताना दिसतायत. मात्र, काँग्रेसला फक्त 17 जागा मिळताना दिसतायत.

TV9 Explainer : जे भल्या भल्यांना नाही जमलं ते केजरीवालांनी करुन दाखवलं, काँग्रेसला सक्षम पर्याय …

महाराष्ट्र अभी बाकी है म्हणणाऱ्यांना महाराष्ट्र तैयार है, शरद पवारांचं प्रतिआव्हान

Goa Election Result 2022 | कोणाला 49, कोणाला 55, सर्वाधिक 342, गोव्यात शिवसेना उमेदवारांना किती मतं?

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.