Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या या बंडखोर आमदारांचा समाजवादी पार्टीत प्रवेश

योगी मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत धर्म सिंह सैनी यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थित झाला.

भाजपच्या या बंडखोर आमदारांचा समाजवादी पार्टीत प्रवेश
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 3:46 PM

उत्तर प्रदेश – निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून राजकारण युपीमध्ये अधिक तापल्याचं पाहायला मिळत आहे. छोटे पक्ष घेऊन अखिलेश यादव (akhilesh yadav) हे आपली मोट घट्ट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काँग्रेसच्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) ताकद पणाला लावून भाजपला शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच सध्या सत्तेत असलेल्या भाजपची मात्र डोकेदुखी वाढल्याचे चित्र कायम आहे. कारण आत्तापर्यंत त्यांच्या 9 आमदारांना बंड करून भाजपवरती गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे आज योगी मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (swami prasad mourya) यांनी अखेर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे.

युपीत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून भाजपला सगळ्या पक्षांनी धक्कातंत्र द्यायला सुरूवात केली आहे. संपुर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या युपीच्या निवडणुकीत राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात घडत आहेत. योगीच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी राजीनामा सत्र सुरू ठेवल्याने भाजपसाठी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न सुध्दा केले जात आहेत.

योगी मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत धर्म सिंह सैनी यांनी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थित झाला. यावेळी बृजेश प्रजापती, भगवती प्रसाद सागर, मुकेश वर्मा, रोशन लाल वर्मा, विनय शाक्य, अपना दल चे चौधरी अमर सिंह, युसुफ अली, नीरज मौर्य, हरपाल सैनी शामिल या कार्यकर्त्यांनी सुध्दा पक्षप्रवेश केला आहे.

भाजप सरकारमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले दारा सिंह चौहान यांनी आत्तापर्यंत कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबतही साशंकता आहे. तसेच दारा सिंह चौहान हे 16 जानेवारीला आपल्या कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करीत पक्षप्रवेश करणार असल्याची सुध्दा चर्चा आहे. पक्षप्रवेशाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी अखिलेश यादव यांना पगडी घालून सत्कार केला. त्यानंतर धर्म सिंह सैनी बोलत असताना असे म्हणाले की, जर कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात नसता, तर आज इथे 10 लाख लोकांच्या उपस्थित पक्षप्रवेश झाला असता. तसेच 2022 ला अखिलेश यादव यांना मुख्यमंत्री आणि 2024 ला त्यांना पंतप्रधान करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, भाजपच्या काही नेत्यांना आमदार खासदार यांच्याशी बोलायला वेळ नव्हता. आज त्यांची झोप उडाली आहे, तसेच आजचा दिवस हा भाजपच्या अंताचा इतिहास लिहिणार आहे.

UP Assembly Election: काँग्रेसने राजकीय मैदानात उतरवली बिकनी गर्ल, बॉलिवूडमध्ये केलंय काम

भाजपचे 9 बंडखोर आमदार आज समाजवादी पक्षात सामील होण्याची शक्यता

UP Assembly Election: उत्तर प्रदेशात शिवसेना इतक्या जागा लढणार ? संजय राऊतांनी केलं स्पष्ट

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.