UP Assembly Election 2022 : निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने बसपा नेत्याला रडू कोसळले, 67 लाख रूपये देऊनही उमेदवारी न दिल्याचा आरोप
काल रात्री उशिरा कोतवाली प्रभारी आनंद देव मिश्रा यांच्यासमोर झालेला प्रकार सांगताना अर्शद राणांना रडू कोसळलं.
उत्तर प्रदेश – यूपी विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर पक्षांतराचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भाजप,(bjp) काँग्रेस,(congress) सपाबरोबर बसपा (bsp) पक्षाचीही स्थिती फारशी चांगली दिसत नाहीये. बसपामध्ये तिकिटाच्या बदल्यात मोठी रक्कम मागितल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्यांनी रक्कम दिली त्यांनी तिकीट न मिळाल्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुझफ्फरनगरच्या थाना नगर कोतवालीच्या चारथावल विधानसभा मतदारसंघाचे बसपा प्रभारी अर्शद राणा यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विधानसभेच्या जागेसाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच तिकिटासाठी 67 लाख रुपये घेतल्याचा आरोपही अर्शद राणा (arshad rana) यांनी केला आहे. माझे पैसे त्यांनी घेतले असून तिकीट दिलेली नाही असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
युपीच्या राजकारणाला वेगळं वळण लागल्याचे अनेक प्रकरणातून आपण पाहिले होते, परंतु हा घडलेला प्रकार किळसवाणा असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. काल रात्री उशिरा कोतवाली प्रभारी आनंद देव मिश्रा यांच्यासमोर झालेला प्रकार सांगताना अर्शद राणांना रडू कोसळलं. अर्शद राणा यांनी तक्रारीत असं म्हटलं आहे, की 18 डिसेंबर 2018 रोजी त्यांची मुझफ्फरनगर जिल्ह्याच्या जिल्हा कार्यालयाच्या विधानसभा जागांच्या प्रभारीपदी नियुक्ती होणार होती. पण दोन दिवसापुर्वी त्यांच्याकडे तिकीटासाठी पैसे मागण्यात आले.
#WATCH | Uttar Pradesh: BSP worker Arshad Rana bitterly cries claiming that he was promised a ticket in UP election only to be denied ticket at the last moment despite putting up hoardings for the upcoming polls pic.twitter.com/DMe8mDHk2J
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 14, 2022
अर्शद राणा ठरलेल्या तारखेला बसपाच्या व्यासपीठावरून २०२२ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करणार होते. शब्द दिला त्यावेळी सहारनपूर विभागाचे मुख्य समन्वयक नरेश गौतम, माजी मंत्री प्रेमचंद गौतम, सत्यप्रकाश, कार्डिनेटर आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष मुझफ्फरनगर सतपाल कटारिया हेही उपस्थित होते. तसेच शेती क्षेत्रासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. अर्शद राणा यांच्याकडून त्यावेळी साडेलाख रूपये घेण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारी घोषित करण्यासाठी वारंवार लाखो रूपये घेतल्याचे राणा यांनी तक्रारीत म्हणटले आहे.
ज्यावेळी अर्शद राणा यांच्याकडून शमशुद्दीन रैनने 17 लाख रुपये घेतले, त्यावेळी सतपाल कटारिया आणि नरेश गौतम हे देखील तेथे उपस्थित होते. निवडणुकीची तारीख जाहीर होताच अर्शद राणा यांनी तिकीट मागितले, त्यानंतर अर्शद राणा यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप अर्शद राणा यांनी केला आहे.