AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला सर्वाधिक पसंती? पुन्हा योगी की यंदा अखिलेश?

एबीपी आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनाच सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे. या सर्व्हेमध्ये योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तर अखिलेश यादव हे मुख्यमंत्री होतील असं उत्तर प्रदेशातील 35 टक्के लोकांना वाटतं. त्यानंतर 14 टक्के लोक मायावती आणि 4 टक्के लोक प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत.

UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला सर्वाधिक पसंती? पुन्हा योगी की यंदा अखिलेश?
अखिलेश यादव, योगी आदित्यनाथ
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 9:15 PM

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने शनिवारी देशातील 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीची (5 State Assembly Election) घोषणा केली आहे. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात आहे. अशावेळी एबीपी आणी सी व्होटर्सचा ओपिनियन पोल जाहीर झाला आहे. या पोलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) यंदा भाजपची लाट काहीशी ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, सर्वात मोठा पक्ष भाजपच ठरणार असून, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनाच मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे.

एबीपी आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनाच सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे. या सर्व्हेमध्ये योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तर अखिलेश यादव हे मुख्यमंत्री होतील असं उत्तर प्रदेशातील 35 टक्के लोकांना वाटतं. त्यानंतर 14 टक्के लोक मायावती आणि 4 टक्के लोक प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत.

कुणाला किती टक्के पसंती?

योगी आदित्यनाथ – 43 टक्के

अखिलेश यादव – 35 टक्के

मायावती – 14 टक्के

प्रियंका गांधी – 4 टक्के

2017 च्या तुलनेत भाजपला मोठा फटका?

2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसचा सुपडा साफ करत भाजपनं 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. मोदी लाटेत स्वार झालेल्या भाजपने 2017 च्या निवडणुकीत 47 वरुन थेट 312 जागांवर मजल मारली होती. तर अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीची 224 वरुन 47 जागांवर घसरण झाली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यता या सर्व्हेत व्यक्त करण्यात आलीय. 2017 मध्ये भाजपनं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होत. तर यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं परीक्षणही मतदार करत असल्याचं या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे.

पंजाबमध्ये कुणाला किती पसंती?

पंजाबमध्ये कॅप्टर अमरींदर सिंह यांना 6 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली, तर सुखबीर सिंह बादल यांना 15 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. दरम्यान, केजरीवाल यांनी आश्चर्यकारकरीत्या आघाडी घेतली आहे. पंजाबमधील 17 टक्के लोकांना अरविंद केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटलंय. तर दुसरीकडे सर्वाधिक पंसती ही चरणजीत सिंह चन्नी यांनाच मिळाली आहे. 29 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांना पसंती दर्शवली असून त्यांच्याखालोखार भगवंत मान यांना पसंती दर्शवली गेली आहे. 23 टक्के लोकांना असं वाटतंय, की भगवंत मान हे मुख्यमंत्री व्हावेत, तर नवज्योत सिंह सिद्धू यांना अवघ्या 6 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दर्शवली आहे. एबीपी न्यूज सी वोटरनं केलेल्या सर्वेतून ही आकडेवारी समोर आली आहे.

इतर बातम्या :

पंतप्रधान मोदींच्या सूरक्षेतील चूक प्रकरणाला नवं वळण मिळणार? ‘या’ संघटनेनं स्वीकारली जबाबदारी!

कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा लहान मुलांसाठी ओमिक्रॉन अधिक घातक?, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.