AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Election 2022 : भाजपला अजून एक मोठा झटका! गुर्जर नेता आणि आमदार अवतार सिंह भडाना यांचा रालोदमध्ये प्रवेश

भाजप आमदार अवतार सिंह भडाना भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केलाय. भडाना हे मेरठच्या मीरापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. रालोदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देताना, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते अवतार भडाना आज राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांच्या उपस्थितीत रालोदमध्ये प्रवेश केला

UP Election 2022 : भाजपला अजून एक मोठा झटका! गुर्जर नेता आणि आमदार अवतार सिंह भडाना यांचा रालोदमध्ये प्रवेश
भाजप आमदार अवतार सिंह भडाना यांचा रालोदमध्ये प्रवेश
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 4:49 PM

उत्तर प्रदेश : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची (5 State Assembly Election) घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना मोठे धक्के बसत आहेत. भाजप आमदार अवतार सिंह भडाना (Avtar Singh Bhadana) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय लोक दलात प्रवेश केलाय. भडाना हे मेरठच्या मीरापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. रालोदने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती देताना, माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते अवतार भडाना आज राष्ट्रीय लोकदलाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांच्या उपस्थितीत रालोदमध्ये प्रवेश केला

दोन दिवसांत भाजपला हा पाचवा मोठा धक्का बसला आहे. अवतार सिंह भडाना यांनी बुधवारी राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांची भेट घेतली आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला. अवतार सिंह भडाना यांनी पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपला वर्चस्व प्राप्त करुन देण्यात मोठी भूमिका बजावली होती. शेतकरी आंदोलनानंतर उत्तर प्रदेशच्या पश्मिम भागात भाजपला काहीसा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भागातूनच उत्तर प्रदेशच्या सात टप्प्यातील मतदानाना सुरुवात होणार आहे. अशावेळी अवतार सिंह भडाना यांनी भाजपची साथ सोडणं पक्षाला मोठ्या अडचणीचं ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

24 तासात 5 बड्या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला

भाजपला मागील 24 तासात 5 बड्या नेत्यांनी मोठा झटका दिलाय. उत्तर प्रदेश सरकारमधील स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बांदाच्या तिंदवारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बृजेश प्रजापती यांनी राजीनामा दिला. त्यांच्यानंतर शाहजहापूरच्या तिलहर मतदारसंघाचे आमदार रोशनलाल वर्मा यांनी भाजपची साथ सोडली. त्याचबरोबर कानपूरच्या बिल्हौरचे आमदार भगवती प्रसाद यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे.

इतर बातम्या :

Nanded : तो आधी महिलांना एकांतात गाठायचा, त्यांचे हातपाय बांधायचा! मग त्यांच्या अंगावरील…

भाच्याचा मामीवर बलात्कार, शूटिंग करुन पुन्हा रुमवर येण्यासाठी ब्लॅकमेल, व्हिडीओ पाहून मामाने…

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.