TV9 Final Opinion Poll: उत्तर प्रदेशात दलित, सवर्ण, तरुण आणि महिला कुणाच्या बाजूने?; यूपीचा पोल काय सांगतो?
दलित, सवर्ण, तरुण, महिला कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे दिसून येत आहे. या पोलनुसार तरुणांबाबत भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये कांटे की टक्कर होणार असे दिसत आहे. तर सवर्ण आणि महिला भाजपला कौल देऊ शकतात असे दिसून येते.
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका (Elections) एकूण सात टप्प्या होणार असून पहिल्या टप्प्याची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही9 भारतवर्ष आणि पोलस्ट्रेटने ओपिनियन पोल (Opinion Poll)द्वारे उत्तर प्रदेशातील जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या ओपिनियन पोलमध्ये जनतेचा कुणाला कौल आहे ? दलित, सवर्ण, तरुण, महिला कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे दिसून येत आहे. या पोलनुसार तरुणांबाबत भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये कांटे की टक्कर होणार असे दिसत आहे. तर सवर्ण आणि महिला भाजपला कौल देऊ शकतात असे दिसून येते. (Dalits, upper castes, youth and women in Uttar Pradesh; What the UP poll says)
महिलांचा कौल कुणाला ?
ओपिनियन पोलनुसार 46.7 टक्के महिला भाजपला मतदान करू शकतात, असे दिसून आले. 28.0 टक्के महिला समाजवादी पक्षाला मतदान करू शकतात. तर 5.6 टक्के महिलांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. तथापि 17.5 महिला बसपाला मतदान करू शकतात. याशिवाय 2.2 टक्के महिला इतर पक्षांना मतदान करू शकतात.
दलितांचा पाठिंबा कुणाला ?
उत्तर प्रदेशातील बसपचे कोर दलित मते टिकून राहतील. त्यामुळे 46.9 टक्के दलित समुदाय बसपाला मतदान करेल तर 37.1 टक्के दलित समाज भाजपला मतदान करु शकते. तथापि 11.2% दलित समाजवादी पक्षासोबत जाऊ शकतात. तर 2.7 टक्के दलितांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. याशिवाय 2.1 टक्के दलित इतर पक्षांना मतदान करू शकतात.
सवर्ण हिंदू कोणाच्या पारड्यात मत टाकणार ?
उत्तर प्रदेशात 71 टक्के सवर्ण हिंदू भाजपला मतदान करू शकतात. 16.2% सवर्ण हिंदू समाजवादी पक्षाला मतदान करू शकतात. तथापि, 6 टक्के सवर्ण हिंदू बसपाला मतदान करू शकतात. 5.4 % सवर्ण हिंदू काँग्रेससोबत जाऊ शकतात. याशिवाय, 1.4 टक्के सवर्ण हिंदू इतर पक्षांना मतदान करू शकतात.
तरुणांचा कुणाला पाठिंबा?
तरुणांच्या मतांबाबत भाजप आणि समाजवादी पक्षात कांटे की टक्कर होऊ शकते. 23 वर्षाखालील वयोगटातले 39.1 टक्के तरुण भाजपसोबत असल्याचे दिसतेय. तर, 38.6% तरुण समाजवादी पक्षाला आणि 15.3% तरुण बसपाला मतदान करू शकतात. ४.८ टक्के तरुण काँग्रेसच्या बाजूने असू शकतात. 2.2% तरुण इतर पक्षांसोबत जाऊ शकतात. (Dalits, upper castes, youth and women in Uttar Pradesh; What the UP poll says)
इतर बातम्या