Owaisi | सलामत रहे नेता हमारा, ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबादमध्ये दिली 101 बकऱ्यांची कुर्बानी आणि…

ओवेसींवरील हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय. सचिन आणि शुभम अशी त्याची नावे आहेत. पण ते कुणाशी संबधीत आहेत, काय करतात, कुठल्या पक्षाचे काम करतात याची माहिती अजून देण्यात आलेली नाही.

Owaisi | सलामत रहे नेता हमारा, ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबादमध्ये दिली 101 बकऱ्यांची कुर्बानी आणि...
असदुद्दीन ओवेसी यांच्या उत्तर प्रदेशात गोळीबार झाला.
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 10:23 AM

हैदराबादः ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबादमध्ये एका व्यापाऱ्याने चक्क 101 बकऱ्यांची कुर्बानी दिली. यावेळी ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी उत्तर प्रदेशातल्या मेरठवरुन दिल्लीच्या जात असताना ओवेसी यांच्यावर दोन पिस्तुलधाऱ्या हल्लेखोरांनी फायरिंग केली. त्यात ओवेसी थोडक्यात बचावले, पण त्यांच्या गाडीची गोळ्यांनी चाळणी झाल्याचे समोर आले. खुद्द ओवेसींनीही त्यांच्या गाडीची काय स्थिती झाली त्याचे फोटो ट्विट केले होते. पोलिसांनी त्यानंतर दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली. मात्र, त्यांनी ती नाकारत उत्तर प्रदेश, केंद्र तसेच निवडणूक आयोगाने ह्या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी केलीय.

ओवेसी म्हणतात 4 हल्लेखोर…

ओवेसींवरील हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय. सचिन आणि शुभम अशी त्याची नावे आहेत. पण ते कुणाशी संबधीत आहेत, काय करतात, कुठल्या पक्षाचे काम करतात याची माहिती अजून देण्यात आलेली नाही. यातला एक आरोपी आधी घटनास्थळावरुन फरार झाला तर दुसरा मात्र स्वत: पोलिसात जाऊन शरण आला. ओवेसींच्या म्हणण्यानुसार चार एक हल्लेखोर होते. असे असेल तर मग त्या सर्वांचा शोध घेण्यासाठी यूपी पोलीसांनी चार पथके तयार केलीयत. दोन आरोपींना पकडल्याची माहिती मेरठचे एसपी दीपक भूकर यांनी दिलीय. इतरांचा सोध सुरूआहे.

समर्थकांची प्रार्थना…

ऐन निवडणुकीच्या आधी ओवेसीवर झालेल्या गोळीबाराने राजकारण तापले आहे. दुसरीकडे ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रार्थना केल्या आहेत. हैदराबादमध्ये एका व्यापाऱ्याने चक्क एकशे एक बऱ्यांची कुर्बानी दिली. यावेळी आमदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते अहमद बलाला यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, 3 फेब्रुवारी रोजीही ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रार्थना केली होती.

राजकारण पेटणार

उत्तर प्रदेशात ओवेसींवर झालेल्या हल्ल्यावरून राजकारण सुरू झाले आहे. येणाऱ्या काळात ते पेटणार आहे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी हा हल्ला घडवून आणला गेला, असा आरोप केला जात आहे. मात्र, पोलीस तपासात याचे दूध का दूध आणि पानी का पानी होणार का, याची उत्सुकता आहे.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....