UP Election 2022 | टिकैत, मथुरा आणि शिवसेना, उत्तर प्रदेशसाठी ठाकरेंचा महाप्लॅन काय? राऊतांनी सविस्तर सांगितलं
वसेनेचे खासदार संजय राऊत सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून ते शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना उत्तर प्रदेशमुधून आपल्या प्रचाराची सुरुवात मथुरा येथून करण्याची शक्यता आहे. तशी माहिती संजय राऊत यांनी दिलीय. ते नवी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. या निवडणुकीत शिवसेनेनेदेखील (Shivsena) उडी घेतली असून येथे तब्बल 50 ते 100 जागा शिवसेना लढवणार आहे. त्यासाठी शिवसेनेचा प्लॅन काय याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.सध्या ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून ते शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेना उत्तर प्रदेशमुधून आपल्या प्रचाराची सुरुवात मथुरा येथून करण्याची शक्यता आहे. तशी माहिती संजय राऊत यांनी दिलीय. ते नवी दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राकेश टिकैत यांची भेट घेणार
उत्तर प्रदेशच्या कोणत्या भागात किती उमेदवार उतरवायचे याचा निर्णय घेतला जाईल. आज मी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. साधारणत: साडे बारा वाजता मी शेतकरी नेते राकेस टिकैत यांची भेट घेणा आहे. याआधी शिवसेनेचे काही कार्यकर्ते तिकडे पोहोचले आहेत. राकेश टिकैत प्रत्यक्ष राजकारणात कधीही सहभागी होत नाहीत. त्यांच्या संयुक्त किसान मोर्चाचा राजकारणाशी संबंध नाही. ते राजकीय नेत्यांशी भेटतही नाहीत. तरीही त्यांची आणि माझी चर्चा होत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
50 ते 100 जागांसाठी उमेदवार उतरवणार
तसेच “उत्तर प्रदेशच्या सर्व भागात 50 ते 100 जागांसाठी आम्ही उमेदवार उतरवणार आहोत. अनेक लहान घटक आहेत, ते आम्हाला भेटत आहेत. या वेळेला शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी त्यांची मागणी आहे. निवडणुकीत काय होईल तो पुढचा प्रश्न आहे. मात्र शिवसेनेचे उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्व दाखवले पाहिजे. एका लढ्यातील हा एक पक्ष आहे. उत्तर प्रदेशची ही गरज आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सर्व खासदार, पक्षाचे प्रमुख लोक यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आमचे प्रतिनिधी असतील याची मला खात्री आहे,” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
अयोध्या, मथुरेत आमचा उमेदवार देणार
तसेच, पुढे बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे काय नियोजन असेल, याबाबतही संजय राऊत यांनी माहिती दिली. “योगी आदित्यनाथ यांना जिथून लढायचं आहे तिथून ते लढू शकतात. अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केलेला आहे. बलिदान दिलेलं आहे. अयोध्येचं आंदोलन थंड पडलेलं असताना, उद्ध ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन वेळा तिथे गेलो. नंतर या विषयला चालना मिळाली. सध्या कोर्टाच्या आदेशाने तिथे मंदिर उभं राहत आहेत. अयोध्येत तसेच मथुरा या मतदार संघातही आमचा उमेदवार असेल. काही लोक आमच्याकडे आले होते. मथुरेत काही प्रश्न आहेत. त्यामुळे शिवसेनेचा प्रचार मथुरा येथून व्हावा अशी काही लोकांची इच्छा आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत मी मथुरेत जाणार आहे. तेथील लोकांना भेटणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या :
Goa Elections 2022 | गोवा विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, महाविकास आघाडीचा प्रयत्न फसणार ?
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : भारतात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 47 हजार 417 कोरोना रुग्ण