Video : शाह-योगींचा घर घर प्रचार, प्रियंका गांधी थेट गॅरेजमध्येच घुसल्या, काय काय सांगितलं?
काँग्रेसचा प्रचार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. यावेळी प्रचार करताना तर प्रियंका गांधी थेट एका गॅरेजमध्ये घुसल्या आणि त्या गॅरेजवाल्याल्या काँग्रेसचा जाहीरनामा त्यांनी नीट समजावून सांगितला.
उत्तर प्रदेश : आज उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (Up Elections 2022) पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकही नेहमीच बहुरंगी होत असते. एकिकडे अमित शाह (Amit Shah) आणि योगी आदित्यनाथ यांनी दोरोदार फिरत उत्तर प्रदेश पिंजून काढला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा प्रचार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. यावेळी प्रचार करताना तर प्रियंका गांधी थेट एका गॅरेजमध्ये घुसल्या आणि त्या गॅरेजवाल्याल्या काँग्रेसचा जाहीरनामा त्यांनी नीट समजावून सांगितला. आपल्या वेगळ्या राजकीय शैलीमुळे प्रियंका गांधी या सतत चर्चेत असतात. उत्तर प्रदेशच्या राजकारणात तर त्या सर्वात जास्त सक्रिय आहेत. सध्या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस पुरेपूर जोर लावत आहे. तर उत्तर प्रदेशचा गड राखण्याचं मोठं आवाहन भाजपपुढे आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यापासून भाजपचे अनेक बडे नेते उत्तर प्रदेशात जोर लावत आहे. भाजपच्या या रथाला अशा अनोख्या प्रचाराने प्रियंका गांधी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रचार जोमात आला
Garage मध्ये बसून म्याकॅनिकला प्रियंका गांधींनी समजावून सांगितला जाहीरनामा #UPElections2022 pic.twitter.com/OuNUJuf0Vi
— Abhishek karande (@Abhishekkaran16) February 10, 2022
गोव्यातला व्हिडिओही चर्चेत राहिला
प्रियंका गांधीही काही दिवसांपूर्वीच गोवा पिंजून काढत होत्या. यावेळी गोव्यातल्या प्रचारावेळी माजी काँग्रेस अध्यक्षांच्या मुलीने असा भन्नाट ओपेरा गायला की प्रियंका गांधी यांच्याही अंगवार काटा उभा राहिला. या मुलीच्याा आणि प्रियंका गांधींच्या व्हिडिओने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. इरेन बॅरोस यांनी प्रियंका यांच्या उपस्थितीत केलेल्या या सुंदर गायनाची देशभर चर्चा आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. प्रियंका गांधी या नेहमीच काहीतरी हटके करण्यासाठी चर्चेत असतात. मागे तर उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असे विचारले असता, त्यांनी मीच असे उत्तर दिल्यानेही चर्चेत आल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी त्या वाक्याबाबत स्पष्टीकरणही दिलं.
कालचं ट्विटही चर्चेत
कालही प्रियंका गांधी त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्या होत्या. बिकिनी असो की घुंगट, जीन्स असो की हिजाब, काय परिधान करायचं, हे ठरण्याचा अधिकार स्त्रीला आहे. संविधानानं दिलेला हा ‘गॅरंटीड’ अधिकार आहे. त्यामुळे महिलांचं शोषण करणं थांबवा, असं ट्वीटर प्रियंका गांधी वाड्रा यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या ट्विटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. #BIKINI बाबात प्रियंका गांधी यांनी ट्वीट केल्यानंतर अवघ्या काही तासांत हजारोंच्या संख्येनं लोकांनी बिकनी विरुद्ध हिजाब असा नवा वादही सुरू केल्याचे दिसून आले. मात्र या वादामुळे का होईना प्रियंका चर्चेत राहिल्या.