योगींच्या शपथविधीचा मंच सजला, सोनिया गांधींपासून ते अंबानींपर्यंत, शपथविधीला कुणा कुणाला निमंत्रणं?
योगी आदित्यनाथ यांचा उद्या शपथविधी (yogi adityanath oath ceremony) आहे. शुक्रवार 25 मार्चच्या या शपथविधीला देशातल्या बड्या नेत्यांसह अनेक मंडळींनी निमंत्रणं दिली गेली आहेत.
उत्तर प्रदेश : गेल्या तीन दशकात उत्तर प्रदेशात (UP elections result 2022) कुणाला पुन्हा सलग सत्ता आण्यात यश आलं नव्हतं. मात्र या निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी ते करून दाखवलं. भाजपला पुन्हा सत्तेत ठेवत योगींनी गड राखला. या निवडणुकांची देशाच्या राजकारण अजूनही भाजपच (Bjp) बाहुबली आहे हेही सष्ट केलं. कारण पाच पैकी चार राज्यात तर पुन्हा भाजपचीच सत्ता आली. पंजाबमध्ये मात्र आम आदमी पार्टीने असा काही झाडू चालवला की क्राँग्रेसचा सुपडा साफ झाला. आता त्याच योगी आदित्यनाथ यांचा उद्या शपथविधी (yogi adityanath oath ceremony) आहे. शुक्रवार 25 मार्चच्या या शपथविधीला देशातल्या बड्या नेत्यांसह अनेक मंडळींनी निमंत्रणं दिली गेली आहेत. त्यात काँग्रेस नेते सोनिया गांधींपासून उद्यागपती मुकेश अंबानी यांच्यापर्यंतच्या मंडळींचा समावेश आहे. त्यामुळे या शपथविधीची
शपविधीचे कुणाला निमंत्रण?
या शपथविधीला मोदी-शाह यांच्यासह भाजपचे बडे नेते तर हजर राहणारच आहेत, मात्र काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती, सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, सपा संरक्षक मुलायमसिंह यादव आणि सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना भाजपचकडून निमंत्रण पत्र पाठवले आहे. याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, आनंद महिंद्रा यांच्यासह डझनभर उद्योगपतींनाही शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रणे पाठवण्यात आली होती.
भाजपची जोरदार पोस्टरबाजी
लखनऊमध्ये शपथविधीसाठी प्रत्येक चौक आणि रस्ता स्वागत पोस्टर आणि भगव्याने झाकण्यात आला आहे. यादरम्यान योगी सरकारने केलेल्या कामांचे एक्सप्रेसवे, विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालय यांसारख्या योजनांचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. यासोबत एक नारा लिहिला आहे की आम्ही प्रतिज्ञा करून नवीन भारताचा नवा उत्तर प्रदेश बनवू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक नेत्यांचे कटआऊट लावण्यात आले आहेत. योगी सरकारच्या योजनांचे पोस्टरही लावण्यात आले आहेत. प्रत्येक चौक भगव्या कपड्याने सजवण्यात आला असून, त्यासोबत भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. सध्या लखनऊमध्ये या शपथविधीची तयारी लगबगीने चालली आहे.
UP Election | लखीमपूर, हाथरस, उन्नाव, जिथल्या घटनांमुळे देशभर भाजपची नाचक्की झाली तिथं कोण जिंकलं?
कोण आहेत पल्लवी पटेल, ज्यांनी मोदी-योगीच्या लाटेतही उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचा पराभव केला?