Uttarakhand Assembly Election 2022: मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्री बदलावे लागले तरी काँग्रेसला नाही जमले, मोदींनी उत्तराखंड कसे राखले?
Uttarakhand Polls: राज्य अस्तित्वात आल्यापासून सातत्याने मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलावा लागणारे राज्य म्हणजे उत्तराखंड (Uttarakhand Election). 2017 च्या विधानसभा निव़डणुकीत भाजपने बहुमत मिळवले. मात्र अंतर्गत कलह वाढत गेल्याने भाजपला वारंवार मुख्यमंत्री बदलावे लागले. एकूणच राज्यातील अस्थिरतेचा लाभ काँग्रेसला होणार अशी चिन्ह होती. अनेक एक्झिटपोल्सनी देखील भाजपला या राजकीय अस्थिरतेचा फटका बसणार असं भाकीत वर्तवलं होतं. […]
Uttarakhand Polls: राज्य अस्तित्वात आल्यापासून सातत्याने मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलावा लागणारे राज्य म्हणजे उत्तराखंड (Uttarakhand Election). 2017 च्या विधानसभा निव़डणुकीत भाजपने बहुमत मिळवले. मात्र अंतर्गत कलह वाढत गेल्याने भाजपला वारंवार मुख्यमंत्री बदलावे लागले. एकूणच राज्यातील अस्थिरतेचा लाभ काँग्रेसला होणार अशी चिन्ह होती. अनेक एक्झिटपोल्सनी देखील भाजपला या राजकीय अस्थिरतेचा फटका बसणार असं भाकीत वर्तवलं होतं. मात्र एवढ्या प्रतिकुलतेतही नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील भाजपने येथे मुसंडी मारल्याचे चित्र आहे. काँग्रेसला (Congress) या निवडणुकीत सपशेल पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुपारपर्यंतचे कौल पाहता, राज्यातील एकूण 70 जागांपैकी 48 जागांवर भाजपने विजय मिळवल्याचं दिसतंय तसेच काँग्रेसच्या पारड्यात जनतेनं 20 जागांचंच दान टाकल्याचं प्राथमिक चित्र आहे.
आजचे निकाल काय?
आज हाती आलेल्या निकालात उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. अद्याप स्पष्ट निकाल हाती आलेले नसले तरीही दुपार्यंतच्या ट्रेंडनुसार, भाजप- 48, काँग्रेस- 20, बसपा-01, अपक्ष- 02, उत्तराखंड जनता पार्टी- 01 अशा जागांवर विजयी होण्याची चिन्ह आहेत.
राजकीय अस्थैर्य, तहीही करुन दाखवलं
9 नोव्हेंबर 2000 मध्ये उत्तराखंड अस्तित्वात आले. भाजपने तेथे नित्यानंद स्वामी यांना मुख्यमंत्री बनवले. त्यानंतर अंतर्गत कलहामुळे सातत्याने मुख्यमंत्री बदलत राहिले. कधी भाजप सत्तेवर आली तर कधी काँग्रेस. मात्र बहुतांश वेळा भाजपतील अंतर्गत गटबाजीमुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा सातत्याने बदलावा लागला. 2017 मधील ची स्थिती पाहता विधानसभा निवडणुकीत भाजप प्रचंड बहुमताने विजयी झाले. त्यावेळी त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. त्रिवेंद्र प्रचंड बहुमतातील सरकारला फक्त 1453 दिवसच चालवू शकते. त्यानंतर 116 दिवसांसाठी तेथे तीरथ सिंह रावत मुख्यमंत्री झाले. निवडणुकीच्या 246 दिवस आधीच पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचा लाभ काँग्रेसला होईल, असा एक सूर निघत होता.
हरीश रावत यांचा पराभव
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने हरीश रावत यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून हरीश रावत यांना उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीतदेखील रावत यांना पराभवाला सामोरे जावे लागणार असं दिसतंय. अधिकृत आकडेवारी अद्याप येणे बाकी असले तरीही काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. 2017 मध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असलेल्या हरीश रावत यांचा भाजपने पराभव केला होता. आतादेखील हरीश रावत यांना पराभव स्वीकारावा लागेल अशीच चिन्ह आहेत.
Sweets (Laddoos) being prepared for distribution among people by elated BJP workers & supporters in Mumbai after the party recorded a thumping victory in Uttar Pradesh, Uttarakhand, Goa & Manipur#AssemblyElections2022 pic.twitter.com/mRdgdhpUrF
— ANI (@ANI) March 10, 2022
एक्झिट पोलचे अंदाजही उलथले
बहुतांश एक्झिट पोलमध्ये उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल असे चित्र दिसून आले होते. भाजपने गेल्या काही दिवसात निर्माण केलेल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा काँग्रेसला होईल, असे बोलले जात होते. मात्र एक्झिट पोलचे अंदाजही भाजपच्या रणनितीपुढे फिके पडल्याचे दिसून येत आहे.
इतर बातम्या-