रॅली, रोड शोची बंदी कायम राहणार का ? आज निवडणुक आयोगाची होणार बैठक; हा निर्णय घेण्याची शक्यता
आज दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली – पाच राज्यात निवणुकीच्या (five state election) प्रचाराचा धुरळा उडत असताना निवडणुक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलचं पालन होत की नाही, यावर निवडणुक आयोग लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे निवडणूक आयोग (Assembly Elections 2022) आज पाच निवडणूक राज्यांचे आरोग्य सचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत आढावा बैठक घेणार आहे. रॅली (rallie) आणि रोड शोवरील (road show) बंदी हटवण्याचा किंवा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
आज दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीकडे पाच राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. कारण या बैठकीत रॅली आणि रोड शोवरील बंदी हटवण्याचा किंवा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा ही पाचही मतदानाची राज्ये निवडणूक आयोगाला लसीकरण आणि कोरोना प्रकरणांची सद्यस्थिती अक्षरशः सादर करतील.
निवडणुक आयोगाची नियमावली
आयोगाने राजकीय पक्षांना 300 लोकांसह किंवा स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के हॉलमध्ये सभा घेण्याची परवानगी दिली आहे. देशात कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता निवडणूक आयोगाने 8 जानेवारी रोजी सर्व राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या रॅलींवर बंदी घातली होती आणि केवळ आभासी प्रचाराला परवानगी होती. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राजकीय पक्षांची पदयात्रा, सायकल यात्रा किंवा रोड शो करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या दिवशी होणार मतदान – उत्तर प्रदेश – 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्चपर्यंत सात टप्प्यात मतदान होणार – उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार – पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होईल – मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारीला आणि 3 मार्चला मतदान होईल सर्व राज्यांचे निकाल 10 मार्चला जाहीर होतील